बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज्यात मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्री भ्रष्टाचारी, काही मंत्री भाई लोकांची मदत घेत आहेत”

ठाणे | भाजप नेते किरीट सोमय्या गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर चौकशीसाठी जास्तच आग्रही आहेत. सोमय्यांनी आतापर्यंत राज्य सरकारमधील काही मंत्र्यांवर गंभीर आरोप करत त्यांच्या चौकशीसाठी केंद्रीय गृहमंत्र्यांपासून राज्यपालांच्या यासंदर्भात भेटी घेतल्या आहेत.

ठाकरे सरकारला ठिकाणावर आणण्यासाठी मी काम करत आहे. मी चौकशीची मागणी करत असल्यानेच काही मंत्र्यांची झोप उडाली आहे. त्यामुळेच राज्यातील काही मंत्रीगण, भाई लोकांची मदत घेत असल्याचा खळबळजनक आरोप सोमय्यांनी केला आहे. मात्र सोमय्यांनी मंत्री कोणते आहेत?, भाई कोणते आहेत? याचा खुलासा केला नाही.

वाशिम येथे माझ्यावर जो हल्ला झाला होता, तो हल्ला शिवसेनेच्या खासदार भावना गवळींच्याच भाई लोकांनी केला होता. या संदर्भात अहवालात माहिती नमूद केली आहे. त्यामुळेच मला केंद्रीय गृहमंत्र्यालयाने मला झेड सुरक्षा दिली आहे, असं सोमय्यांनी म्हटलं आहे. सोमय्या आज ठाणे महापालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी आले होते. त्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

दरम्यान, मी माझं काम माझ्या पद्धतीने पार पाडत आहे. राज्यात मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्री भ्रष्टाचारी आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गुंड गोळ्या घालून मारून टाकण्याची धमकी देत आहेत. तरी मी मला सुरक्षा मागितली नाही. माझ्याबाबतीत जी धमकी आली आहे, ते फक्त नाटके आहेत. पोलिसांनी फक्त एनसी घेतली आहे, असं सोमय्या म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या –

गर्भवती असूनही रुग्णांची केली सेवा; नुकतीच आई झालेल्या डॉक्टरचा कोरोनानं घेतला जीव

वेगाने वजन कमी करण्यासाठी ‘या’ पेयांचा आहारात समावेश करा!

किरीट सोमय्यांच्या सुरक्षेत वाढ; सोमय्यांना आता थेट मोदी सरकारकडून CISF कवच

देवेंद्र फडणवीसांवर पक्षाने सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘प्रत्येक घरात परवानाधारक शस्त्रे ठेवावीत’; ‘या’ भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More