शिवसेनेचे एवढे खासदार फुटण्याची शक्यता, मोठी माहिती आली समोर…
मुंबई | एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला आणि अखेर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आलं. भाजपने देवेंद्र फडणवीस यांना वगळून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करत मोठा राजकीय डाव टाकला आहे. यावरून मुंबई ताब्यात घेण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यात आली आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना पक्षाची वाताहात झाली आहे. त्यामुळे आता पक्षप्रमुखांनी बंडवीर एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घ्यावं असं शिवसेनेच्या खासदारांना वाटत आहे. तशी इच्छाही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून दाखवली असल्याची माहिती समोर आलीये.
उद्धव ठाकरे यांनी काल (1 जुलै) रोजी खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला शिवसेनेचे ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. शिवसेनेकडे एकूण 19 खासदार आहेत. त्यापैकी तीन खासदार कालच्या बैठकीला गैरहजर होते. एकनाथ शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदे, भावना गवळी आणि ठाण्यातील खासदार राजन विचारे हे उपस्थित नव्हते. यावेळी खासदारांनी आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी एकनाथ शिंदेंशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला.
शिंदे यांच्या संपर्कात शिवसेनेचे 14 खासदार असल्याचा दावाही करण्यात आला आहे. शिवाय हे 14 खासदार वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचा दावा भाजपच्या एका नेत्याने केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
थोडक्यात बातम्या –
छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेच्या प्रवक्ते पदी डॉ. धनंजय राजाराम जाधव यांची निवड
बंडखोर आमदार राहिलेल्या गुवाहाटीच्या हॉटेलचं एकूण बिल किती?; आकडा वाचून धक्का बसेल
ईडीच्या चौकशीची पिडा टळली; उद्धव ठाकरेंसाठी दिलासादायक बातमी समोर
“शासकीय पूजेनंतर महिन्याभरात शिंदे-फडणवीसांचं सरकार कोसळणार”
2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा- देवेंद्र फडणवीस
Comments are closed.