बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गडकरींची टोलेबाजी! “आमदारांना मंत्री न झाल्याचं दु:ख आहे तर, मंत्र्यांना…”

जयपूर | केंद्रीय दळणवळण आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आपल्या खुमासदार शैलीसाठी सर्वत्र परिचीत आहेत. गडकरी हे आपल्या भाषणातून राजकीय आणि सामाजिक दाखले देत तुफान फटकेबाजी करत असतात. असाच एक प्रसंग आज राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये घडला आहे.

समस्या सर्वांसोबत आहेत, स्वपक्षात आणि पक्षाबाहेर आहेत. तसेच आजकालच्या राजकीय परिस्थितीत प्रत्येकजण दु:खी आहे. आमदारांना मंत्री न झाल्यामुळं दु:ख आहे तर, मंत्र्यांना चांगलं खातं न मिळाल्याचं दु:ख आहे. ज्या मंत्र्यांकडे चांगलं खातं आहे, ते मुख्यमंत्री पदासाठी दु:खी आहेत. तर, काही जण मुख्यमंत्री पदावरून हटवण्यात आल्याच्या भीतीमुळं दु:खी आहेत, असं म्हणत गडकरींनी राजकीय घडामोडींवर कोणाचंही नाव न घेता जोरदार टोलेबाजी केली आहे.

नितीन गडकरींनी आज राजस्थान विधानसभेच्या एका संसदीय परिसंवादामध्ये सहभागी झाले होते. गडकरींनी या परिसंवादामध्ये तुफान राजकीय फटकेबाजी केली आहे. कोणी मंत्री न बनल्यामुळे दु:खी आहे तर, कोणाला खुर्ची जाण्याची भिती आहे, म्हणत त्यांनी काही राजकीय नेत्यांना चिमटे घेतले आहेत.

दरम्यान, नितीन गडकरी यांनी राजकारणात येणाऱ्या चढउतारांवर भाष्य करत म्हणाले की, नागपूरमध्ये त्यांच्या एका काँग्रेस पक्षातील मित्राने भाजप सोडून काँग्रेस पक्षात येण्याचे आमंत्रण दिलं होतं. पण, मी विचारांशी तडजोड केली नाही, असं म्हणत गडकरींनी त्यांच्या राजकीय आठवणींना उजाळा दिला.

थोडक्यात बातम्या –

‘…पण ठाकरे सरकारने विश्वासघात केला’; भाजपची घणाघाती टीका

एमपीएससीच्या मुख्य परीक्षेची तारीख ठरली; ‘या’ 6 केंद्रांवर होणार परीक्षा

“दुसऱ्यांच्या मुलांकडे बोट दाखवण्याआधी आपला मुलगा काय करतो ते पहावं”

“स्वत:ला अग्रस्थानी ठेवून नवा इतिहास लिहिण्याचा भाजपचा प्रयत्न”

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More