औरंगाबाद महाराष्ट्र

शिवसेनेविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या मराठा तरुणाला बेदम मारहाण

औरंगाबाद | महाराष्ट्र बंद आंदोलनात शिवसेना आणि उद्धव ठाकरेंविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलीय.  शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आंदोलनात सहभागी झाले तेव्हा काही आंदोलकांनी शिवसेनेविरोधात घोषणा दिल्या. चिडलेले दानवे आंदोलकांवर धावून गेल्यानं राडा झाला. त्यामुळे दानवेंनी याठिकाणावरुन काढता पाय घ्यावा लागला.

दरम्यान, काही वेळानं यातील एका तरुणाला अज्ञातांनी दम दिला. हा तरुण आंदोलन सोडून गेल्यानंतर त्याला रस्त्यात गाठून गाडीत टाकून अज्ञातस्थळी नेऊन बेदम मारहाण करण्यात आली. 

सध्या हा तरुण दहशतीखाली असल्यामुळे कुणाचं नाव घ्यायला तयार नाही. त्याने अद्याप पोलीस तक्रारही दिली नसल्याचं कळतंय. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा मोर्चेकऱ्यावर धावून जाणाऱ्या अंबादास दानवेंना मोर्चेकऱ्यांनी हुसकावून लावलं

-राज्यात पेटलेल्या मराठा वणव्यास सरकारच जबाबदार- विखे-पाटील

-फडणवीस यांच्या विरोधात वैयक्तीक घोषणा नको; अजित पवारांची मोर्चेकऱ्यांना ताकीद

-मराठ्यांना दंड आकारा; उच्च न्यायालयात याचिका दाखल

-आता कामकाज पाहण्यासाठी आदित्य ठाकरे संसदेत…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या