बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी… अमृता फडणवीस यांच नवं गाणं

मुंबई | विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात. येत्या महिला दिनी त्यांचे नवं गाणं प्रदर्शित होणार आहे. अमृता फडणवीस यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत माहिती दिली. त्यामुळे मिसेस फडणवीसांच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

जेव्हा ती संघर्षपथावर निघाली तेव्हा तिला – कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…तिने मात्र जगाला दाखवून दिले की तिच्या प्रगतीचा प्रवाह रोखणे शक्य नाही. ‘स्त्री शक्ती’ला गौरवान्वित करणारे माझे नवीन गीत 8 मार्च रोजी, जागतिक महिला दिनी! अशी माहिती अमृता फडणवीसांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

8 मार्चला आपलं नवीन गाणं रिलीज होणार असल्याची माहिती अमृता फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. ट्रोलर्सना तयार राहण्याचाही इशाराही त्यांनी दिला होता. माझं आणखी एक गाणं येतं आहे. मी ट्रोलर्सना या गाण्यातून उत्तर देईन, असं मिसेस फडणवीस म्हणाल्या होत्या.

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’साठी एक इंग्रजी गाणंही रिलीज केले होते. अमृता फडणवीस यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर आणि ट्विटरवर हे नवं गाणं पोस्ट केलं आहे. शक्ती हासिजा यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे. प्रसिद्ध इंग्रजी गायक लिओनेल रिचीनं हे मूळ गाणं गायलं आहे. या गाण्यात लिओनेलने एका संगीत शिक्षकाची भूमिका साकारली आहे. या गाण्यात तो एका अंध मुलीच्या प्रेमात पडल्याचंही दाखवण्यात आलं आहे. हेच गाणं आता अमृता फडणवीस यांनी गायलं आहे.

थोडक्यात बातम्या –

‘जिल्हा परिषदांमधील आरक्षणाचा फटका ओबीसी बांधवांना बसू नये म्हणून…’; अजित पवारांनी केलं मोठं वक्तव्य

“मोदी सरकारची चमचेगिरी करणाऱ्यांच्या उलाढाली स्वच्छ आहेत काय?”

…अन् राज ठाकरेंनी माजी महापौरांना देखील मास्क काढायला लावला!

‘टुरिस्ट गाईड’ बनायचंय? राज्य सरकारचा हा ऑनलाईन कोर्स लवकरच सुरू होणार; सविस्तर वाचा…

अन् भर विधानसभेत ‘या’ काँग्रेस आमदारानं काढला शर्ट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More