बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवसेनेनं यापूर्वीही अशी गद्दारी पचवली, पुन्हा एकदा गद्दारांना गाडून आपला भगवा फडकवू”

मुंबई | महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी गेल्या काही दिवसात घडत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीमुळे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काही स्वार्थी लोकांनी पक्षाशी गद्दारी केली, अशी बोचरी टिका शिवसेना नेता विनायक राऊत यांनी बंडखोर आमदारांवर केली.

गुरूवारी माहिम मतदार संघांतील शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेविका, नगरसेवक यांची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना नेता विनायक राऊत उपस्थित होते. ज्या लोकांनी गद्दारी केली, अशा गद्दरांना गाडून आपला भगवा फडकवू असं ते म्हणाले.

काही स्वार्थी लोकांनी पक्षाशी गद्दारी केली. अद्याप माहिम मतदारसंघात शिवसेना अजूून शाबूत आहे. ते अजूनही मजबूत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना खंबीर काम करत आहे. अशी गद्दारी शिवसेनेने याआधी पचवली आहे, अशी टीका त्यांनी माध्यामांशी बोलताना केली आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदेच्या बंडखोरीमुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या काही नेत्यांनी मिळून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पत्र लिहिलं. एकनाथ शिंदेसह 12 आमदारांना निंलबित करावं, अशी मागणी त्या पत्रात होती. यावर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत उत्तर दिलंय.

थोडक्यात बातम्या

‘…तर घर गाठणं कठिण होईल’, नारायण राणेंचा शरद पवारांना थेट इशारा

महिन्याभरानंतर केतकी चितळेची तुरूंगातून सुटका, बाहेर येताच म्हणाली…

खरंच चार्टर्ड प्लेनने आला होतात का?, ‘त्या’ फोटोंवर नितीन देशमुखांची प्रतिक्रिया

एकनाथ शिंदेंच्या बंडाळीवरून अजित पवारांचं भाजपला क्लिनचीट, म्हणाले…

‘घरचे दरवाजे उघडे आहेत, चर्चा होऊ शकते’; संजय राऊतांचं बंडखोर आमदारांना आवाहन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More