बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“त्या पार्टीत आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफिया होता, सीसीटीव्ही फुटेज चेक केलं तर…”

मुंबई |  बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली आहे. त्यानंतर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यात मोठा वाद सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा वाद चिघळताना दिसतोय. त्यातच आता ‘नवाब मलिक यांनी क्रुझ प्रकरणाचा तपास भरकटवण्यासाठी नवाब मलिक वेगवेगळ्या पद्धतीने गोष्टी उघड करत आहेत असं म्हटलं जातंय. मात्र ज्या गोष्टी चुकीच्या आहेत. त्यासमोर आणणं माझं काम आहे’, असं नवाब मलिक यांनी माध्यमांना सांगितलं आहे.

ड्रग्ज पार्टी सुरू असलेल्या एका क्रुझवर एक आंतराष्ट्रीय ड्रग्ज माफिया होता. त्याच्यासोबत त्याची गर्लफ्रेंड होती. ती हातात खतरनाक रिव्हॉल्व्हवर घेऊन उपस्थित होती. त्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियाचे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंशी मैत्रीचे संबंध आहेत, अशी माहिती मला मिळाली आहे, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. या पार्टीत नाचताना एक दाढीवाला आहे. तो दाढीवाला कोण आहे. हे एनसीबीच्या अधिकाऱ्यांना माहित आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

जे चौकशी अधिकारी आहेत त्यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले तर त्यांना त्या पार्टीत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया उपस्थित होता हे दिसेल. खेळ झाला परंतू खेळाचा खेळाडू गाडी घेऊन का फिरत आहे, याचं एनसीबीने उत्तर द्यावं, असं आव्हान नवाब मलिक यांनी केलं आहे. हे आज बोलत आहेत त्याचे पुरावे काही दिवसात आपल्या समोर ठेवणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, समीर वानखेडे आणि क्रुझ रेव्ह पार्टीतील दाढीवाला  यांच्यात चांगला दोस्ताना असल्यामुळे  त्याला कारवाईतून वगळण्यात आले, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच इतर लोकांना टार्गेट करण्यात आले, असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. हे प्रकरण गंभीर असून जर गंभीरतेने घेतले नाही तर पुरावे सार्वजानिक करण्यात येतील असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या- 

“माझं नाव ज्ञानदेवच पण, बायको मला प्रेमानं दाऊद म्हणायची”

“फडणवीस इथं येऊन गाजर वाटून गेले असतील”

कोरोना हा मोसमी आजार? वैज्ञानिकांच्या संशोधनातून धक्कादायक खुलासा

“फडणवीस यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याची अवस्था मला बघवत नाही”

द बर्निंग बस! भर रस्त्यात बसने अचानक घेतला पेट अन्…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More