बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कुणीही येईल आणि तुमच्या खिशात पुडी टाकून तुम्हाला अटक करेल”

मुंबई | बाॅलिवूड अभिनेता शाहरूख खानच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर राज्यातील राजकारण तापलेलं दिसत होतं. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीवर गंभीर आरोप करत भाजपवर देखील टीका केली होती. त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीत चांगलीच खडाजंगी पहायला मिळाली. याच प्रकरणावरून आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनसीबीवर निशाणा साधला आहे.

पत्रकार परिषद घेत शरद पवार यांनी एनसीबीच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. एनसीबी अधिकाऱ्यांचं मीडिया नियोजन आयोजन एवढं चांगलं आहे, हे मला माहिती नव्हतं, पहिल्यांदा हे माझ्या लक्षात आलं आहे. सतत काही गोष्टी सोडायच्या, आपण त्याला मराठीत पुड्या सोडणं म्हणतो, अशा पुड्या सोडून राजकारण करायचं आणि कोणाला तरी बदनाम करायचं, अशी टीका शरद पवारांनी एनसीबीवर केली आहे.

केंद्रीय यंत्रणापासून लांब रहा, असं मी गेल्या काही वर्षापासून ऐकतोय. एखादा कुणीही येईल आणि तुमच्या खिशात पुडी टाकून तुम्हाला अटक करेल, अशी जहरी टीका देखील शरद पवारांनी यावेळी केली आहे. केंद्र सरकार आता या थराला पोहचली आहे. यासंदर्भात एका वेगळ्या फोरमवर बोलावं लागेल. इथं बोलून उपयोग नाही, असं म्हणत शरद पवारांनी भाजप सूचक इशारा देखील दिला आहे.

दरम्यान, आयकर विभागाने थेट अजित पवारांवर कारवाई न करता, आयकर विभाग त्यांच्या जवळच्या व्यक्तींवर कारवाई करत आहे. हे केंद्र सरकारचं लक्ष करण्याचं धोरण आहे, असंही शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

काजू-बदाम कशाला??? फक्त शेंगदाणे खा… होतील फायदेच फायदे

अखेर बळीराजाला मदत! ठाकरे सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“ती ऑफर न स्वीकारायला शरद पवार काही कच्च्या गुरुचे चेले नाहीत”

मोदी सरकारचा खासगीकरणाचा सपाटा सुरुच, आता विकणार ‘ही’ कंपनी

फडणवीसांना मुख्यमंत्री असल्यासारखं का वाटतं?, चंद्रकांत पाटलांनी सांगितलं खरं कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More