बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हवामानाची माहिती देत असतानाच महिला अँकरसोबत घडलं असं काही की…; पाहा गंमतीशीर व्हिडिओ

नवी दिल्ली | वृत्तवाहिन्यांवर अनेक वेळा आपण तांत्रिक अडचणीमुळे काही प्रकार घडत असताना पाहत असतो. वृत्तवाहिनीचे वृत्तनिवेदक बातम्या देत असताना त्यांना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच काही मजेशीर घटनांचा देखील ते घटक बनतात. अशावेळी ते मोठी मेहनत घेऊन अविरतपणे आपलं काम सुरू ठेवतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये महिला अँकर हवामानाची बातमी देत असताना पाहायला मिळत आहे. हवामानाची बातमी देत असतानाच अचानक त्या महिलेच्या मागे असलेल्या स्क्रीनवर तिची क्लोन इमेज पाहायला मिळते. अशावेळेस ती महिला या घटनेचा आनंद घेत चालू बातमीपत्रात क्लोन इमेजवरून गंमतीशीर वागायला लागते.

कॅमेरापुढे कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला असे फिरून ती त्या इमेजची मजा घेत असताना या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणी जरी असतील तरी योग्य वेळी घाबरून न जाता किंवा शांततेने अशाही घटना वेगळ्याप्रकारे हाताळता येऊ शकतात. याचं उत्तम उदाहरण त्या महिला वृत्तनिवेदिकेने दाखवून दिलं आहे.

दरम्यान, ही घटना आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीने फॉक्स-9 न्यूज स्टुडिओमध्ये घडली असून त्या महिला वृत्त निवेदिकेचं नाव जेनिफर असं आहे. या व्हिडीओ मधील जेनिफरचे हावभाव आणि वागणूक अत्यंत हास्यास्पद असल्याने नेटकऱ्यांनी मात्र या व्हिडिओला चांगलीच पसंती दिली आहे.

पाहा व्हिडीओ –

थोडक्यात बातम्या –

लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम?; मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घट

तौक्ते चक्रीवादळाने घेतला वेग; ‘या’ जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान, विजपुरवठाही खंडीत

कोरोना रुग्णांसाठी भन्नाट कल्पना; कोविड सेंटरमध्येच उभारलं ग्रंथालय

भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू जडेजा यांचं कोरोनानं निधन

दिलासादायक बातमी! राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या अधिक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More