बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुलासोबत व्हिडीओ शूट करताना अचानक घोडी बनली महिला अन्…., पाहा व्हिडीओ

मुंबई | कोरोना काळामध्ये अनेक महिला सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झालेल्या पाहायला मिळतात. यामध्ये अनेक गृहिणींनी आपले छंद जोपासायला सुरूवात केली असून, आपले व्हिडीओ यावर शेअर करत असतात. त्याचप्रमाणे अनेक माता आपल्या मुलांसोबतचे व्हिडीओ, फोटोही सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच एक सोशल मीडियावर आई आणि मुलाचा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये एका महिलेनं आपल्या मुलाला जवळ घेतलेलं आहे. ती त्या मुलासोबत सेल्फी कॅमेऱ्याने एक व्हिडीओ शूट करत असल्याचं दिसत आहे. तो लहान मुलगा मोबाईलकडे एकदम टक लावून पाहत असून, व्हिडीओ शूट करताना अचानक त्या महिलेच्या चेहऱ्याचा आकार बदलायला सुरूवात होते. काही वेळानंतर त्या महिलेचं तोंड एका घोड्याप्रमाणे दिसून लागतं. आपल्या आईच्या तोंडाचा आकार अचानक बदलल्यामुळे तो लहान मुलगा घाबरून जातो. त्या महिलेचं तोंड घोड्याचं दिसत असल्यामुळे ते पाहून तो जोर-जोरात रडायला सुरूवात करतो.

तसेच आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की सध्या सगळे सोशल मिडीयावरील जे काही ट्रेन्ड सुरू असतात. ते फॉलो करायचा प्रयत्न करतात. आजकाल तर इंस्टग्राम हे खूप जास्त प्रमाणात वापरलं जातं. या अॅपमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्टही दिले गेलेले असतात. त्याच्या आधारे आपण आपल्या चेहऱ्याचा कोणताही आकार करू शकतो.

व्हिडीओतील महिलेनं इंस्टग्रामवरील इफेक्टचा वापर करून घोड्याचं तोंड आणलं आहे. या व्हिडीओवर अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. 

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

नदीवर पाणी प्यायला गेलेल्या कुत्र्यावर मगरीनं केला हल्ला अन्…, पाहा व्हिडीओ

लॉकडाऊनचं काय करायचं?; कॅबिनेट मंत्र्यांनाच कळेना,कुणी म्हणतंय वाढवावा, कुणी म्हणतंय नको!

शरद पवारांचे सरकारला पुर्ण आशिर्वाद, हे सरकार 5 वर्ष चालेल- संजय राऊत

“मृतदेहांवरून राजकारण कसं करावं हे माणसातील गिधाडांकडून शिकावं”

शरद पवार अॅक्शन मोडमध्ये; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीचे नेते प

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More