बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘दाल मे कुछ काला है, 106 आमदार असलेल्या पक्षाचा मुख्यंमंत्री होत नाही म्हणजे काय?’

मुंबई | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करुन महाराष्ट्राचे राजकारण हदरवून सोडले. त्यानंतर त्यांनी आपल्या गटाच्या आमदारांसोबत भाजपशी युती करत सत्ता स्थापन केली. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. आज विधानसभेत सुरु असलेल्या दोन दिवसीय विशेष  अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव 164 या बहुमताने पास झाला. त्यांनतर बऱ्याच मान्यवर नेत्यांनी अभिनंदनाचे भाषण केले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील यावेळी यादीच वाचून शिंदे गट आणि भाजपला धारेवर धरले.

या सरकारमध्ये 106 आमदार असलेल्या पक्षाचा आमदार मुख्यमंत्री होत नाही आणि 39 आमदारवाला होतो, यात काहितरी काळंबेरं आहे, असे पवार म्हणाले. महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा होती. पण सर्वांच्या आग्रहाखातर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असेही पवार म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राबाहेर असताना आपल्या नाराजीचे कारण राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहे असे सांगितले होते, त्याचा सुद्धा पवारांनी खरपुस समाचार घेतला.

पवार म्हणाले, भाजपबरोबर अनैतिक युती करुन अनेकांनी राष्ट्रवादीने आमच्यवार अन्याय केला असा खोटा आरोप करुन आमच्या पक्षाला आणि युतीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. पण सर्वांना माहित आहे, मी काम करताना कधीच भेदभाव करत नाही. 288 पैकी 288 आमदारांना निधी मिळावा याची आम्ही काळजी घेतली होती. नगरविकास खात्याला 12 हजार कोटी निधी दिला असं सांगताना सर्वांना निधी दिल्याची यादीच पवारांनी वाचून दाखविली.

बंडखोर आमदारांवर देखील त्यांनी चांगलाच निशाणा साधला. त्यांच्या सुरत, गुवाहाटी आणि गोव्याच्या मुक्कामाचा दाखला देत चांगलीच टीका केली. तसेच शिवसेनेत बंड करुन गेलेले छगन भुजबळ आणि नारायण राणे त्यानंतरच्या निवडणुकीत कसे पडले याचा थोडक्यात इतिहास देखील अजित पवारांनी सांगितला.

थोडक्यात बातम्या – 

‘…तर शिंदे साहेब महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल’, शिवसेना आमदाराचं मोठं वक्तव्य

‘… तर नाकापेक्षा मोती जड अशी अवस्था होईल’ -देवेंद्र फडणवीस

“आमच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, अशी परिस्थिती होती मात्र…”

कालीमातेच्या तोंडात सिगारेट पाहून नेटकरी भडकले, वाचा सविस्तर

मोठी बातमी! बहुमतापेक्षा जास्त मतं मिळवत शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More