…असं काही झालं आणि 2 फुटी अजीम मन्सुरींसाठी वधूंची रांग लागली; ऐकूण तुम्हीही थक्क व्हाल!
मुंबई | यूपीमधील शामली येथे राहणारे अजीम मन्सुरी यांना लग्नासाठी मुलगी न मिळाल्याने त्याची उंची कारणीभूत ठरत होती. कारण अजीम यांची उंची फक्त 2 फुट 3 इंच आहे. अनेक महिन्यांपासून ते लोकांना त्यांच लग्न लावून देण्याची मागणी करत आहे. मात्र, कोणीही त्याची मदत करण्यास तयार होत नव्हतं. वैतागलेले अजीम थेट पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि स्टेशनमधील महिला अधिकारी असलेल्या मॅडमलाच आपल्या लग्नाच्या अडचणीबद्दल माहिती दिली. मात्र, ही बातमी सगळीकडे पसरताच त्यांच्यासाठी वधूंची रांग लागली आहे.
अजीम मन्सुरी यांच्या लग्नाची बातमी थेट बाॅलिवूड पर्यंत पोहचली आहे. सलमान खानने स्वत: त्यांना मुंबईला येण्यासाठी आमंत्रण पाठवले आहे तेव्हापासून ते खूप आनंदी आहेत, असं त्यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर त्यांनी त्यांची व्यथाही सांगितली होती की, लग्न होत नसल्यानं मी एसडीएम ते मुख्यमंत्र्यांकडे लग्न लावून देण्यासाठी विनंती केली होती. बर्याचदा लग्नासाठी स्थळं आली होती. मात्र, उंची कमी असल्यामुळं कोणतीही बोलणी पुढे सरकू शकली नव्हती.
अजीमचे घरातले सांगतात की, जेव्हापासून त्यांच्या लग्नाच्या अडचणीबद्दल बातम्या माध्यमात आल्या आहेत. तेव्हापासूनच त्यांच्या विवाहासाठी स्थळं येण्यास सुरुवात झाली आहे. बर्याच मुलींकडून आणि त्यांच्या परिवाराकडून फोन येत आहेत. तसंच अझीम मन्सुरी म्हणतात की, सलमान खान सोबतच सिनेसृष्टीतील बाकी कलाकारसुद्धा मला भेटायला बोलवत आहेत. त्यामुळे मी प्रचंड खूश आहे.
दरम्यान, अझीम त्यांच्या सहा भावंडांपैकी ते सर्वात धाकटे आहेत. त्याच्या उंचीमुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. कारण, लोक त्यांच्या उंचीची नेहमीच चेष्टा करतात. शाळेतही त्यांना इतका त्रास झाला की, त्यांना शिक्षण सोडावं लागलं. व्यवसायात प्रवेश केला. त्यानंतरच त्यांनी एक कॉस्मेटिक शॉप सुरु करण्याचा निर्णय घेतला. आपल्या भावासोबत तिथे काम करण्यास सुरुवात केली. जेव्हा ते 21 वर्षांचे होते, तेव्हापासून ते वधूचा शोध घेत होते.
थोडक्यात बातम्या –
‘ममता बॅनर्जी यांची उमेदवारी रद्द करा’; भाजप नेत्यानं ममता बॅनर्जींवर केले धक्कादायक आरोप
पुणे शहरातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी
भाजपला मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
“भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना श्रीरामाप्रमाणे देव मानून त्यांची पूजा केली जाईल”
Comments are closed.