बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनी महिलेसोबत घडलं असं काही, नीचपणाचा कळस!

लाहोर | पारतंत्र्यातून देश स्वातंत्र्य होतो पण देशातील लोकांची मानसिकता बदलणं हे खूप महत्वाचं असतं. महिला या आपल्या न्याय आणि हक्कासाठी लढताना पहायला मिळाल्या आहेत. देशाची संस्कृती टीकण्यासाठीही त्या देशातील महिलांबाबत देशातील नागरिक काय विचार करतात हे महत्वाचं असतं. त्यांना सन्मानजनक वागणूक देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे.

पाकिस्तान या देशाचा स्वातंत्र्यदिन 14 ऑागस्ट हा होता. इतर देश हे स्वातंत्र्यदिनी आपल्या पूर्वजांनी किती त्यागाने हे स्वातंत्र्य मिळवलंय हे सांगत असतात. पण पाकिस्तान मात्र आपल्याला हे स्वातंत्र्य फुकटात मिळाल्यासारखं वागत असतो. त्यांना त्यांच्या देशातील महिलांनी अजूनही बाहेर मोकळेपणाने वागलेलं जमत नाही. असंच काही या प्रसंगातून पाहायला मिळत आहे.

पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी मिनार-ए-पाकिस्तान जवळ व्हिडीओ शुट करणारी एक टिक टाॅक स्टार ही आपल्या टीमसह शुटिंग करत होती. तिथे आलेल्या जमावाने तिला वाईट वागणूक दिली. शेकडो लोकांच्या जमावाने तिच्यावर हल्ला केला तिचे कपडे फाडले. तिच्या बरोबर असलेल्यांना देखील जमावाने त्रास दिला. मोबाईल फोन आणि इतर साहित्य, 15000 रक्कम ही हिसकावण्यात आली.

लाहोर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 300 ते 400 अज्ञात लोकांविरूद्ध हा गुन्हा दाखल केला आहे. मला व माझ्या सहकाऱ्यांना फरपटत नेल गेलं. आम्हाला मदत करण्यासाठी कोणाला येऊ देखील दिलं नाही. स्वातंत्र्यदिनी माझ्यासोबत हे घडलं याचं वाईट वाटत असल्याचं त्या टीक टाॅक स्टारने म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या 

तालिबानच्या तावडीतून वाचली महिला, सांगितली आपबिती काळजाचा थरकाप उडवणारी

टी-20 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, पाकिस्तानविरुद्ध रंगणार पहिला सामना, पाहा व्हिडीओ

अफगाणिस्तान तालिबान्यांकडे जाताच भारताला मोठा धक्का, ‘या’ गोष्टीवर निर्बंध!

पाकिस्तानने मागितली माधुरी दीक्षित, ‘शेरशहा’च्या उत्तरानं शत्रू देखील हादरले!

अफगाणिस्तानात शरिया कायदा लागू होणार, महिलांवर कोणती बंधनं येणार?, वाचा…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More