बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भर मंडपात नवरीने केलं असं काही की…; सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर आजकाल अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या नवरा-नवरीचे लग्नातील व्हिडीओ व्हायरल होण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्यातील काही व्हिडीओ खूपच मजेशीर असतात. तर काही व्हिडीओ विचित्र आणि धक्कादायकही असतात.

आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की, लग्न हा एक असा सोहळा असतो की, त्यासाठी आपण किती पैसे खर्च करायला तयार असतो. त्या सोहळ्यातील प्रत्येक क्षण आपल्या लक्षात राहावा यासाठी आपण अनेक गोष्टी करतो. त्या सगळ्या गोष्टी आपण फोटोंच्या माध्यमातून आठवणीत ठेवण्याचा प्रयत्न करतो. तसेच आजकाल कॅमेरा समोर आला की लोक पोझेस द्यायला सुरू करतात. सगळ्यांना सध्या फोटोचं खूप वेड लागलं आहे.

अशातच याच संबंधी एका नवरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यामध्ये नवरीने स्वत:च्याच लग्नात असं काही केलं आहे की, त्यामुळे हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एका ठिकाणी लग्नसोहळा सुरू असल्याचं दिसून येत आहे.

व्हिडीओतील नवरी भर मंडपात कॅमेरा समोर येताच वेगवेगळे हावभाव करण्यास सुरूवात करत असल्याचं पाहायला मिळत आहे. सुरूवातीला ती कॅमेऱ्याकडे पाहते आणि दोन बोट वर करते. त्यानंतर कॅमेऱ्याकडेच पाहून आपले डोळे मिचकवते आणि गालातच हसते. नवरीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना तिचे हावभाव आवडले आहेत. त्याचबरोबर अनेकांनी या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या आहेत.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

कोरोनामुळे नोटांचा उडतोय रंग, ‘हे’ ठरतंय कारण!

तिनं नग्न व्हायला सांगितलं, ते नग्न झाले; पुण्यात 150 पेक्षा जास्त जणांसोबत धक्कादायक प्रकार

8 वर्षाच्या मुलाला कोविड सेंटरचं टॅायलेट साफ करायला लावलं, महाराष्ट्रातील घटनेनं खळबळ

आता कोरोनाचा पूर्ण नायनाट होणार?; शास्त्रज्ञांनी विकसित केली अँटी व्हायरल थेरपी

जागतिक बँकेचे शिक्षण विषयक सल्लागार म्हणून रणजितसिंह डिसले यांची नियुक्ती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More