बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आई-पत्नीमधील सततच्या वादाला वैतागून मुलाने उचललं धक्कादायक पाऊल!

जयपूर | राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. आई-पत्नीमधील सततच्या वादाला वैतागून मुलाने अत्यंत संतापजनक कृत्य केलं आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. क्रूरपणे केलेलं कृत्य लपवण्यासाठी मुलाने अनेक प्रयत्न केले.

झुंझुनू जिल्ह्यातील रघुवीरपूरा येथे रविवारी 75 वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला. याबाबतची माहिती संबंधित महिलेच्या मुलाने पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित ठिकाणाची तपासणी केल्यानंतर पोलिसांना महिलेच्या मुलावर संशय आला. त्यानंतर मुलाला चौकशीसाठी नेण्यात आलं. मुलाने काही वेळ टाळाटाळ केली मात्र नंतर आपला गुन्हा कबुल केला.

आरोपी मुलाचं नाव अशोक कुमार असं आहे. तसेच मृत आईचं नाव शरबती देवी असं आहे. शरबती देवी आणि त्यांच्या सुनेमध्ये वारंवार किरकोळ कारणांवरुन वाद होत असे. त्यांच्या या वादाला शरबती यांचा मुलगा अशोक प्रचंड वैतागला. यातून त्याने आपल्या जन्मदात्या आईचा गळा दाबून तिची हत्या केली. एवढंच नाही तर तिचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या आंगावर पेट्रोल ओतून तिचा मृतदेह जाळला.

याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत हत्येचं गुढ उलगडलं असून आरोपी मुलाला अटक केली आहे. त्याच बरोबर या हत्येत सुनेचा काही संबंध आहे का? याचा तपासही पोलिसांकडून केला जात आहे.

थोडक्यात बातम्या-

“कोणीही जिंको, देशाचं प्रचंड नुकसान होत असताना अशा विजयाचा काहीच फायदा नाही”

भारतनानांना जे जमलं ते मुलाला राखता आलं नाही, पंढरपुरात भगीरथ भालकेंना धक्का!

बाबो! ‘या’ अभिनेत्रीला कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याचा झालाय एवढा आनंद, म्हणते…

#विधानसभा_निवडणुक2021 तामिळनाडूत सत्तांतराची शक्यता; द्रमुक तब्बल एवढ्या जागांवर आघाडीवर

“देशात काही आठवड्यांचा संपूर्ण लॉकडाऊन घोषित करा”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More