बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लेकीच्या शाळेच्या व्हॅट्सअॅप ग्रुपवर वडिलांनी पाठवलं असं काही की…

जयपूर | राजस्थानच्या जयपूर येथील शाळेच्या ऑनलाईन क्लासदरम्यान अचानक 10 अश्लील व्हिडीओ आल्याने क्लासमध्ये खळबळ उडाली. या घटनेनंतर जी माहिती समोर आली त्याने सर्वांना धक्का बसला. एक विद्यार्थीनीच्या वडिलांनी हे व्हिडीओ पाठवले असल्याचं समोर आलं आहे.

जयपूरच्या मुहामा परिसरातील कल्याणपूरच्या शासकीय शाळेतील ऑनलाईन क्लास सुरु होते. यादरम्यान मुलांच्या मोबाईलवर अचानक 10 अश्लील व्हिडीओ आले. व्हिडीओ पाहून शिक्षकांना तसेच पालकांना देखील धक्का बसला. यानंतर शाळेच्या मुख्यध्यापकांनी पोलिसात तक्रार केली.

या प्रकरणाचा तपास लावल्यानंतर इयत्ता पाचवीतील विद्यार्थीनीच्या वडिलांनी हे व्हिडीओ पाठवले असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी संबंधित वडिलांनी अटक केली आहे. या वडिलांचं नाव साबीर अली असं आहे. या गुन्ह्यामुळे साबीर यांना पाच वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.

दरम्यान, पोलिसांना याबाबत सांगताना साबीर यांनी हे व्हिडीओ मोबाईलमध्ये कुठून तरी आले होते. तसेच ते आपल्याकडून चुकून सेंड झाल्याचं साबीर यांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या धोक्यामुळे देशभरातील शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरु आहेत. अशातच ऑनलाईन क्लासवेळी अनेक धक्कादायक गोष्टी घडत असल्याचं समोर आलंय.

थोडक्यात बातम्या-

‘मला सहा तास कोंडून ठेवलं, अन्…’,पत्रकार परिषदेत सोमय्यांचा गंभीर आरोप

झंझावाती खेळी करत ऋतुराज गायकवाडने ‘हा’ विक्रम केला आपल्या नावावर

देव तारी त्याला कोण मारी! धावत्या रेल्वेमध्ये चढताना महिलेचा तोल गेला अन्…

सोमय्यांच्या आरोपांमागे भाजपमधील ‘हा’ नेता; मुश्रीफांचा धक्कादायक आरोप

“चंद्रकांत पाटलांनी पुरुषार्थ दाखवावा, समोर येऊन लढावं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More