बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मला कधी कधी वाटतं मोदी आणि गडकरी यांच्यात स्पर्धा सुरू आहे”

अहमदनगर | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी देशातील लोकप्रिय राज्यपालांपैकी एक आहेत. राहूरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 35 वा दीक्षांत समारंभ त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला आहे. याप्रसंगी भगतसिंग कोश्यारी यांनी विविध विषयांवर आपली प्रखर मतं व्यक्त केली आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबद्दल त्यांचं एक वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे.

भगतसिंग कोश्यारी यांनी व्यासपीठावर उपस्थित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. नितीन गडकरी यांची तुलना आपल्या देशात सातत्यानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी होते. मला कधी कधी वाटत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांच्यात स्पर्धा चालू आहे, असं वक्तव्य कोश्यारी यांनी केलं आहे. परिणामी त्यांच्या या वक्तव्याची सध्या राज्यभर जोरदार चर्चा होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेवढ्या झपाट्याने काम करतात तेवढ्या झपाट्याने नितीन गडकरी करत आहेत, असंही भगतसिंग कोश्यारी यांनी यावेळी म्हटलं आहे. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे देखील उपस्थित होते. देशभरातून नितीन गडकरी यांच्या कामाबद्दल कौतुक केलं जात. देशभर उच्च दर्जाच्या रस्त्यांची निर्मीती करणं हे आपलं लक्ष्य असल्याचंही गडकरी यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, नितीन गडकरी यांची लोकप्रियता आपल्या कामाच्या माध्यमातून असल्याचं गडकरींचे विरोधक सुद्धा मान्य करतात. सध्या केंद्र सरकार आणि महाविकास आघाडीत तणावाचं वातावरण असलं तरी गडकरी यांच्याबाबात महाविकास आघाडी सरकारचे मंत्री नेहमीच सकारात्मक भूमिका घेत असल्याचं राज्यानं अनेकदा पाहिलं आहे.

थोडक्यात बातम्या 

आर्यन खानला जामीन मंजूर पण न्यायालयात नेमकं काय झालं; वाचा सविस्तर

“दाऊद तर पाकिस्तानात आहे, मग तो इकडे कसा येऊ शकतो”

‘तुषार भोसले माफी मागा नाहीतर…’; ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्यावर राष्ट्रवादी आक्रमक

‘एक बाप म्हणून मी खूप…’; आर्यन खानच्या जामिनानंतर आर. माधवनचं ट्विट

अखेर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे; दिवाळीआधी प्रवाशांना मोठा दिलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More