Top News देश

“कधी-कधी वाटतं, पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेसची खरी गरज”

नवी दिल्ली |  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसविरोधात जनआंदोलन करण्याची भाषा केली होती. मात्र आता त्यांना आंदोलन खटकत आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय विश्लेषक आणि शेतकरी आंदोलक योगेंद्र यादव यांनी मादींवर निशाणा साधला आहे .

कधी-कधी वाटतं, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काँग्रेसची खरी गरज आहे, असं म्हणत योगेंद्र यादव यांनी मोदींना टोला लगावला आहे.  योगेंद्र यादव फेसबुक लाईव्हवर बोलत होते.

जर काँग्रेस राहिली नाही तर पंतप्रधानांच काय होणार?, असा सवालही योगेंद्र यादव यांनी केला. तसंच मोदींनी राज्यसभेत शेतकरी आंदोलनावरुन केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘आंदोलनजीवी’ हा नविन शब्द जन्माला घातला असल्याचं योगेंद्र यादवांनी म्हटलं.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला घाबरत आहेत. ते खूप मोठ्या खुर्चीवर बसले आहेत. अशावेळी अशा पद्धतीचं बोलणं त्यांना शोभत नसल्याचंही योगेंद्र यादव म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

गेहना वशिष्ठ अश्लील व्हिडीओ रॅकेटप्रकरणी मोठा खुलासा, बड्या अभिनेत्रीचा नवरा…

“…त्यावेळी गुलाम नबींना पराभूत करण्याचा प्रयत्न केला, मात्र…”; पवारांनी सांगितला ‘तो’ खास किस्सा

अश्रुजीवी!!! काॅंग्रेस नेत्याविषयी बोलताना पंतप्रधान मोदींना अश्रू अनावर

‘त्या’ आत्महत्या केलेल्या तरुणीचे मंत्र्यासोबत प्रेमसंबंध?; पोलीस काय म्हणाले???

सरकार शोधतंय स्वयंसेवक करावी लागणार ‘ही’ कामं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या