बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कधी कुणाला दहशतवादी समजून गोळ्या घातल्या जातात तर कधी देशद्रोही ठरवून जेलमध्ये टाकलं जातं, आता फक्त…”

नवी दिल्ली | शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज नवी दिल्ली येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. यावेळी संजय राऊत यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांची रायगड भेट, गिरीश कुबेर (Girish Kuber) यांच्यावर झालेली शाईफेक, सावकरांचा मुद्दा, नागालॅंड प्रकरण अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी नागालॅंड प्रकरणावरुन मोदी सरकारवर जोरदार आरोप केल्याचं पहायला मिळालं. याविषयी बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं की, नागालँडच्या प्रकरणावर सरकारनं माफी मागितली आहे. कधी कुणाला दहशतवादी समजून गोळ्या घातल्या जातात तर कधी आमच्यासारख्या लोकांना देशद्रोही ठरवून जेलमध्ये टाकले जातं. आमच्यावर फक्त गोळ्या घालत नाहीत एवढंच.

गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याच्या कृत्यावरही राऊत यांनी भाष्य केलं. अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनामध्ये गिरीश कुबेर (Girish Kuber) यांच्यावर झालेल्या शाई फेकीच्या कृत्याचा आम्ही निषेध करतो, असं राऊत म्हणाले.

दरम्यान, शाईफेक कृत्याचा निषेध केला असला तरीही, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांविषयी लिहिताना सावधगिरी बाळगणं आवश्यक असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं.

थोडक्यात बातम्या – 

महाराष्ट्रात लाॅकडाऊन लागणार?; अजित पवार म्हणतात…

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला ईडीचा जोरदार झटका; केली लूकआउट नोटीस जारी

ओमिक्रॉन संकटाबाबत देशपातळीवर निर्णय घेणं गरजेचं -अजित पवार

‘…नाहीतर मोठ्या प्रमाणात Omicron चा संसर्ग होऊ शकतो’; राजेश टोपेंचा गंभीर इशारा

शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवींचा मोठा निर्णय; स्वीकारणार हिंदू धर्म

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More