बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कधी-कधी कार्यकर्त्यांचा आक्रोश होत असतो, पण पंकजा मुंडे असे काही करणार नाहीत”

कोल्हापूर | मोदींच्या मंत्रीमंडळाचा विस्तार सोहळा पार पडला आहे. त्यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचाही समावेश असेल, अशा चर्चा सुरू होत्या. मात्र प्रीतम मुंडेंना केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये कोणतच स्थान न दिल्यामुळे  अनेक मुंडे समर्थकांनी आपल्या पदाचे राजीनामे पाठविले आहेत. त्यांच्या या राजीनाम्यांवरून भाजप नेते अशिष शेलार यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

कधी कार्यकर्त्यांच्या भावनाचा आक्रोश होतो. त्याला काही पक्षद्रोह मानण्याचे कारण नसल्याचं अशिष शेलार यांनी म्हटलं आहे. आज अशिष शेलार पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

तसेच, अशिष शेलार यांना नाना पटोले यांनी केलेल्या आरोपांवर विचारण्यात आले.त्यावेळी नाना पटोले कधीच आपल्या विधानावर ठाम राहत नाहीत. ते कधीच केलेल्या वक्तव्यावर ठाम राहत नाहीत. आधी फोन टॅपिंगबद्दल बोलले, त्यानंतर मुंबईवरून ते लोणावळ्यात आले आणि हवामान बदलल्याप्रमाणे त्यांचे वक्तव्यही बदलले. तिकडे त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली. पुन्हा हवामान बदललं तर पुन्हा केंद्र सरकारकडे बोट दाखवतील. जो माणूस स्वत: च्या विधानावर टिकू शकत नाही. त्याची केस काय टिकणार?, असा खोचक टोला शेलारांनी पटोलेंना लगावला आहे.

दरम्यान, प्रीतम मुंडे यांना मंत्रीमंडळामध्ये स्थान न दिल्यामुळे. मुंडे समर्थकांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यायला सुरूवात केली असून,  आतापर्यंत 105 जणांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंकजा मुंडे समर्थकांसोबत महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीमध्ये पंकजा मुंडे नेमका काय निर्णय घेणार? याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“नानांनी त्या विषयाला फार गांभिर्याने घेऊ नये”

“मी सर्व कार्यकर्त्यांचे राजीनामे नामंजूर करत आहे; मोठा नेता नेहमी त्याग करतो”

…म्हणून पुढील दोन-तीन दिवसात टाळेबंदीचा निर्णय घेतला जाईल – किशोरी पेडणेकर

वर्ल्डकप चॅम्पियन ‘यशपाल शर्मा’ यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन

‘चंद्राच्या हालचालीमुळे पृथ्वीवर येणार विनाशकारी संकट’; नासाच्या अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More