बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शाहरुख खानच्या मुलाला सोडून द्या, मी पण गांजा घेतला होता”

मुंबई | बॉलिवूडचा किंग शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात नुकतीच अटक झाली आहे. अजूनही त्याची सुटका झालेली नाही. या घटनेनंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आर्यन खान तसेच शाहरुख खानला आपला पाठिंबा दिला होता. यावरच बोलताना आता सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड असलेल्या सोमी अली एक धक्कादायक खुलासा केला आहे. मी दिव्या भारतीसोबत गांजा घेतला होता, असं तीनं म्हटंल आहे.

सोमी अलीने आर्यन खानच्या समर्थनार्थ इंन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तीने आर्यन खानच्या अटकेबद्दल दु:ख  व्यक्त केलंय. आर्यन खानला घरी जाण्यासाठी परवानगी मिळायला हवी, असं तीने म्हटलं आहे. आपणही दिव्या भारतीसोबत गांजा घेतला होता, असा धक्कादायक खुलासा सोमीने केला आहे. ड्रग्ज हे वेश्या व्यवसायासारखं आहे ते कधीही संपणार नाही. त्यामुळे दोघांनाही गुन्हेगारीच्या श्रेणीतून बाहेर काढले पाहिजं, असं मत देखील तीनं व्यक्त केलं आहे.

कोणीही संत नाही. मी पंधरा वर्षाची असताना गांजा वापरून पाहिला आणि आंदोलन चित्रपटाच्या शुटींगमध्ये दिव्या भारतीसोबत गांजा घेतला. तसेच याबद्दल मला कोणतीही खंत नाही, असं सोमीने पोस्टमध्ये म्हटलं आहे. कोणत्या मुलाने ड्रग्जसोबत प्रयोग केला नसेल? असा सवाल या इंन्स्टाग्राम पोस्टमध्ये सोमी अलीने  केला आहे. मुले ही मुले असतात, त्याचं हे उदाहरण आहे, असंही सोमी अलीने म्हटलं आहे.

दरम्यान, न्यायव्यवस्थेला आर्यनचा वापर करून आपला मुद्दा सिद्ध करायचा आहे. या मुलाला विनाकारण त्रास होत आहे. न्यायव्यस्थेने खुनी आणि बलात्कारींना पकडले तर कसे होईल? असा उफराटा प्रश्न देखील सोमी अलीने केला आहे.

थोडक्यात बातम्या-

“तुम्ही ज्या मुख्यमंत्र्याची जात काढली, त्याच मुख्यमंत्र्याने मराठा आरक्षण दिलं”

नात्याला काळिमा फासणारी घटना, सख्ख्या दिराकडून वहिनीवर वारंवार बलात्कार

“बहुजन आधीच उपाशी, त्यात…”; मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे संतापल्या

‘…त्याआधीच अजित पवारांनी आरक्षण रद्द केलं’; गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप

“शिवसेना निवडणुकीसाठी अशा पद्धतीनं पैसा गोळा करते”; मनसेचा खळबळजनक आरोप

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More