Somnath Awghade | नागराज मंजुळे दिग्दर्शित फँड्री या चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर चांगलाच धूमाकुळ घातला होता. आज सुद्धा या चित्रपटाची आणि चित्रपटातील गाण्याची क्रेझ कायम आहे. या बरोबरच चित्रपटातील अभिनेता सोमनाथ अवघडे आणि अभिनेत्री राजेश्वरी खरात यांनी साकरलेल्या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात घर केलेलं आहे.
सोशल मीडियावर राजेश्वरी आणि सोमनाथचा (Somnath Awghade) चाहतावर्ग जबरदस्त आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या प्रेम प्रकरणाच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र सध्या सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाचा फोटो व्हायरल होत असल्यामुळे जब्याला शालू मिळाली का?, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
काय आहे प्रकरण?
सोशल मीडियावर राजेश्वरी आणि सोमनाथ (Somnath Awghade) या दोघांचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सोमनाथ आणि राजेश्वरी लग्नाच्या मंडपात बसले आहेत. दोघांच्या डोक्याला बाशिंग बांधलेले पहायला मिळत आहेत. यावेळेस राजेश्वरीने पिवळ्या रंगाची साडी नेसल्याचं दिसत आहे. तर सोमनाथ पांढऱ्या शुभ्र कपड्यात दिसतोय. हा एक फोटो पाहून या दोघांचं मनोमिलन झालेलं असून ते आता लग्न करत आहेत का? असं विचारलं जातंय.
व्हायरल फोटो-
View this post on Instagram
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये राजेश्वरी आणि सोमनाथ यांच्या हळदीचा कार्यक्रम असल्याचं वाटत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी दोघेजण लग्न करणार असल्याचं म्हटलं आहे. तर त्यांच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, ‘अखेर चिमणी घावली जब्या ला…..’, तर ‘जब्या न शालू वर काळ्या चिमणीची राख टाकली रे’, अशा प्रकारे कमेंट्स या पोस्टवर होत आहेत.
मात्र हा फोटो त्यांच्या आगामी कलाकृतीचा एक भाग आहे का? अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या फोटोमागचा नेमका अर्थ काय? हे लवकरच स्पष्ट होईल. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यांनी आपाल्या इन्स्टाग्रामवर एकमेकांसोबतचे अनेक फोटो आणि रिल्स पोस्ट केलेले आहेत. त्यामुळेच हे दोघे आता लग्न करणार का?, अशा चर्चा रंगल्या आहेत.
News Title : somnath awghade and rajeshwari kharat to tie wedding knot
महत्त्वाच्या बातम्या-
अजित पवारांना धक्का, सोलापुरात तब्बल ‘इतक्या’ नेत्यांनी हाती घेतली तुतारी
लक्ष्मीपूजनापूर्वीच सोनं महागलं; जाणून घ्या आजचे लेटेस्ट भाव
भाजपचे ‘हे’ 12 नेते शिंदेंच्या धनुष्यबाणावर तर 5 जण घड्याळच्या तिकिटावर रिंगणात!
ऐन दिवाळीत उडणार महागाईचा भडका?, 1 नोव्हेंबरपासून ‘या’ नियमांत बदल होणार
“बेबी..आपली लव्हस्टोरी रामायणापेक्षा कमी नाही”; सुकेशचं जॅकलिनला आणखी एक पत्र