बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

साताऱ्याचे सुपुत्र सोमनाथ मांढरे यांना लडाखमध्ये वीरमरण, गावावर शोककळा

सातारा |  वाई तालुक्यातील आसले गावच्या पुत्राला लडामध्ये वीरमरण आलं आहे. सोमनाथ मांढरे असं या जवानाचं नाव आहे. लडाखमधील बर्फाच्छादित प्रदेशात प्रतिकुल वातावरणाशी लढताना त्यांना श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ लागल्याची माहिती समोर आली आहे.

सोमनाथ मांढरे यांना मिल्ट्रीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमनाथ मांढरे यांच्या निधनामुळे आसले गावावर शोककळा पसरली आहे.

सोमना मांढरे यांच्या जाण्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आठ वर्षांचा मुलगा, अवघ्या दहा महिन्यांची मुलगी आणि लहान भाऊ असा परिवार आहे.

हुतात्मा जवान सोमनाथ मांढरे यांचे पार्थिव आज पहाटे दिल्लीत पोहोचेल. त्यानंतर, सायंकाळपर्यंत आसले या मूळ गावी पोहोचेल व त्यांच्यावर शासकीय इतमामात आसलेत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

थोडक्यात बातम्या- 

ही माझी शेवटची राजकीय लढाई- कॅप्टन अमरिंदर सिंग

TMC आता नवीन डाव खेळण्याची शक्यता; पक्षात प्रवेश करताच बाबूल सुप्रियोंना मोठं गिफ्ट?

राज्यातील ‘या’ भागात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज!

“मी सांगितलं, राजीनामा देतोय, सोनिया म्हणाल्या, I AM SORRY अमरिंदर”

अंघोळीसाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा भीमा नदीत बुडून मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More