सूर्यवंशी कुटुंबाने 10 लाख रुपये नाकारले, राज्य सरकारला मोठी चपराक

Somnath Suryawanshi family refuses aid demands judicial inquiry

Somnath Suryawanshi | सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला राज्य सरकारने जाहीर केलेली मदत सूर्यवंशी कुटुंबाने नाकारली आहे. 10 लाख रुपयांचा शासकीय मदतीचा धनादेश कुटुंबाला देण्यासाठी प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी बुधवारी त्यांच्या घरी भेट दिली. मात्र, न्याय मिळेपर्यंत मदत स्वीकारणार नसल्याची भूमिका कुटुंबाने घेतली. संविधान अवमान आंदोलनानंतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi ) यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. त्यांना 15 डिसेंबरला अटक झाली होती. मात्र आता त्यांच्या कुटुंबाने शासकीय मदत स्वीकारण्यास नकार दिल्याने राज्य सरकारसाठी ही मोठी चपराक मानली जात आहे.

पोलीस मारहाणीमुळे मृत्यू?

सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस मारहाणीमुळे झाला नसून, न्यायालयीन कोठडीत असताना त्यांच्या छातीत अचानक जळजळ सुरु झाली आणि रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. विधानसभेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली होती.

सूर्यवंशींच्या मृत्यूचा तपशील-

मुख्यमंत्र्यांनी सोमनाथ सूर्यवंशी  (Somnath Suryawanshi ) यांच्या मृत्यूचा तपशील सभागृहात मांडला. सोमनाथ हे आंदोलक होते आणि कायद्याचे शिक्षण घेत होते. ते मूळचे लातूरचे होते आणि त्यांचे कुटुंब पुण्यात राहायचे. सोमनाथ हे परभणीत शिक्षण घेत होते. परभणीत जी जाळपोळ सुरू होती, त्या व्हिडिओत सूर्यवंशी दिसत असल्याने त्यांना अटक करण्यात आली होती.

मॅजिस्ट्रेटसमोर हजर केले होते

सूर्यवंशी यांना दोन वेळा मॅजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आले होते. दोन्ही वेळा मॅजिस्ट्रेटने त्यांना विचारले की, पोलिसांनी तुम्हाला मारहाण केली का? यावर सूर्यवंशी (Somnath Suryawanshi ) यांनी नकार दिला होता. पोलीस कोठडीत असतानाचे फुटेजही उपलब्ध असून त्यात त्यांना कुठेही मारहाण झाल्याचे दिसत नाही, असंही त्यांनी सांगितलं होतं.

श्वसनाचा त्रास होता

पोस्टमार्टम अहवालानुसार, सूर्यवंशी यांना श्वसनाचा दुर्धर आजार होता. वैद्यकीय अहवालात त्यांच्या जुन्या जखमांचाही उल्लेख आहे. त्यांच्या एका खांद्याजवळचे हाडही तुटले होते. न्यायालयीन कोठडीत असताना सकाळी छातीत जळजळ सुरू झाली. त्यावेळी पोलिसांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले, मात्र त्यांना तिकडे मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती.

न्यायालयीन चौकशीचे आश्वासन

सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi ) यांच्या मृत्यूनंतर अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत. राज्य सरकार सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची आर्थिक मदत करेल. या प्रकरणात उपस्थित झालेल्या शंकांचे निरसन व्हावे यासाठी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली हीच मदत स्वीकारण्यास सूर्यवंशी कुटुंबाने नकार दिला आहे.

News Title : Somnath Suryawanshi family refuses aid demands judicial inquiry
महत्वाच्या बातम्या –

वाल्मिक कराडबद्दल आणखी एक धक्कादायक माहिती उघड, लाडकी बहीण योजनेच्या…

शेतकऱ्यांसाठीची महत्त्वाची योजना रखडली; या कारणामुळे योजनेचं भविष्य अधांतरी

आजचे राशिभविष्य! तुमच्या जीवनाचा मार्गदर्शक संदेश, नक्की वाचा

मनसे आणि भाजपची युती होणार? ‘या’ बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य

“… तर सुरेश धस यांना बंदुकी दिसल्या नाहीत का?”; ‘या’ नेत्याचा मोठा दावा

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .