भोपाळ | भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेली व्यक्ती देशभक्त असू शकत नाही, असं म्हटलं आहे. चाणक्य यांनी फक्त भुमिपूत्रच आपल्या मातृभूमीचं रक्षण करु शकतो असं सांगितलं होतं, असंही त्या म्हणाल्या आहेत.
भोपाळमध्ये कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर बोलताना प्रज्ञासिंह ठाकूर यांनी हे वक्तव्य केलंय. प्रज्ञासिंह ठाकूर यांनी राहुल गांधींसोबत सोनिया गांधी यांच्यावरही निशाणा साधलाय.
काँग्रेसमध्ये ना सभ्यता आहे ना संस्कार आहेत. दोन देशांचं नागरिकत्व असलेल्यांकडून आपण देशभक्तीची अपेक्षा करु शकत नाही, असं म्हणत प्रज्ञासिंह ठाकूर यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलंय.
मध्यप्रदेशचे काँगेस प्रवक्ता जे पनी धनोपिया यांनी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मानसिक तोल ढासळला असल्याचं म्हटलं आहे. तसंच भाजप नेत्यांनी त्यांच्यावर उपचार केले पाहिजेत, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
‘या माझ्या महाराष्ट्रात गुंतवणूक करा!’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गुंतवणूकदारांना साद
महत्वाच्या बातम्या-
अभिनेत्री तापसी पन्नूला आलं ‘इतक्या’ हजारांचं वीज बिल; ट्विट करत व्यक्त केला संताप
सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी आता ‘या’ अभिनेत्रीची चौकशी होणार
शोएबला भारतात असलेली त्याची पत्नी सानियाला भेटायचं आहे पण…