सांगली | महाराष्ट्र राज्य सेवा 2021 ची गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. सांगली जिल्ह्यातील प्रमोद चौगुले याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रमोद चौघुले हे सलग दुसऱ्यांदा राज्यात प्रथम आला आहे.
सध्या ते नाशिक येथे उद्योग उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत. आता प्रमोद चौघुले खाकी वर्दीत दिसणार असून त्याचं डीवायएसपी होण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे.
चौगुले यांचं मूळ गाव मिरज तालुक्यातील सोनी हे आहे, मात्र गेल्या सात वर्षांपासून त्यांचे कुटुंब कामानिमित्त सांगलीत स्थायिक आहे. प्रमोदचं शिक्षण पलूस येथील नवोदय विद्यामंदिरातून झालं आणि त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण वालचंद महाविद्यालयातून पूर्ण झालं.
त्याचं यश हे त्याच्या पालकांचं एक ध्येय होतं. याच कारणामुळे प्रमोदच्या आई-वडिलांनी त्यांना कधीही कसलीही कमतरता पडू दिली नाही, जेणेकरून त्यांच्या मुलांना शिक्षण मिळावं.
प्रमोदचे वडील टेम्पो ड्रायव्हर होते आणि आई टेलरचे काम करत होती. 2020 मध्ये, प्रमोद चौगुले यांना MPSC मध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळाला आणि नंतर त्यांची उद्योग विभागात उपसंचालक म्हणून नियुक्ती झाली. त्याचे प्रशिक्षण नाशिकमध्ये सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या-