बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Coronavirus | आईची काळजी मिटावी म्हणून पिंपरीत शिकणारा मुलगा घरी परतला

पुणे | पुणे आणि पिंपरीत कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे सगळ्यांनीच या व्हायरसची धास्ती घेतली आहे. यामुळे पिंपरीत शिक्षणासाठी लातूरहून आलेला एक मुलगा आईच्या सततच्या काळजीमुळे गावी परतला आहे.

पिंपरी चिंचवड किंवा पुण्यात अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असतात. पिंपरीत शिकणारा मुकेश हंबीरे हा मुलगा आईच्या काळजीमुळे घरी पोहचला आहे. खासगी बसने तो शनिवारी रात्री लातूरकडे निघाला आणि त्यानंतर लातूरला घरी पोहचला.

मुकेश हंबीरे हा तरुण देखील पिंपरी-चिंचवड शहरात गेली तीन वर्षे झालं शिक्षण घेत आहे. मात्र कोरोना चा प्रादुर्भाव हा शहरात मोठ्या प्रमाणावर वाढल्याने मुकेश ची आई काळजी पोटी दिवसातून अनेक वेळा फोन करून काळजी घे असे सांगत असून लवकर गावी ये असा आग्रह करत होती. त्यामुळे अखेर त्याने लातूरला जाण्याचा निर्णय घेतला आणि तो लातूरला पोहचला आहे.

दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून करोना ने थैमान घातल आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढतच चालला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

इराणमध्ये अडकलेले 236 भारतीय मायदेशी परतले

मध्य प्रदेशनंतर ‘या’ राज्यात काँग्रेसला धास्ती; 14 आमदारांची जयपूरला रवानगी

महत्वाच्या बातम्या-

… म्हणून महाजन, आशिष शेलारांकडे पाहत जयंत पाटील म्हणाले….फडणवीस साहेब यांना तिकडे बसवा!

कोरोनाला रोखण्यासाठी मास्क गरजेचा नाही, साधा रूमाल वापरा!

डोनाल्ड ट्रम्प यांनी केली कोरोना चाचणी; आला ‘हा’ रिपोर्ट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More