बुलडाणा | शेतात कामाला जा आणि कमवून आण, असं म्हणत 75 वर्षीय वृद्ध आईला मुलांनी घरातून हाकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना बुलडाणा येथे घडली आहे.
वयोवृद्ध आईला घरातून बाहेर काढल्याने वृद्ध आई खामगावच्या सामान्य रूग्णालयाचा सहारा घेत कसेबसे खाऊन जीवन जगत आहेत. द्वारकाबाई पल्हाडे असं या वयोवृद्ध आईचं नाव आहे.
हद्यद्रावक घटनेमुळे परिसरातील नागरिकांचे मन हेलावलं आहे. वृद्ध आईने पोलिसांत तक्रार दिल्यावर आता पोलिसांकडून त्या वृद्ध आईला सुखरूप घरी पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, द्वारकाबाई या 75 वर्षांच्या आहेत. त्या दोन मुलं, सून आणि नातवंडांसह पळशी येथे राहतात. मात्र काही दिवसांपासून द्वारकाबाई पल्हाडे यांना त्यांचा मुलगा सहदेव आणि वासुदव पल्हाडे यांनी घरातून हाकलून दिलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
प्रेमी युगलाला मारहाण करणारे सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात
“विरोधकांना गाडण्यात माझी पी. एचडी; म्हणूनच पक्षानं मला दिल्लीत बोलावलं”
महत्वाच्या बातम्या-
“साध्वी प्रज्ञा मूर्ख, आमचं दुर्दैव की त्या आमच्या पक्षात आहेत”
नरेंद्र मोदी माझे पंतप्रधान; केजरीवालांनी पाकिस्तानच्या मंत्र्याला सुनावलं
भाजपनं सुरु केलेल्या योजना बंद करु नका; रावसाहेब दानवेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन
Comments are closed.