Sonakshi Sinha | 7 सप्टेंबररोजी देशभरात गणरायाचे आगमन झाले. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटीच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाले. अशात नवीन लग्न झालेलं जोडपं म्हणजेच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचा पती झहीर इक्बाल यांनी देखील लग्नानंतर पहिला गणेशोत्सव साजरा केला. सोनाक्षी नवऱ्यासोबत बाप्पाची आरती करताना दिसून आली. तिने या प्रसंगाचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(Sonakshi Sinha )
मात्र, या फोटोमुळे पुन्हा एकदा सोनाक्षी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. सोनाक्षीने गणेशोत्सवाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.या व्हिडीओमध्ये सोनाक्षी सिन्हा पती झहीरसोबत गणपती बाप्पाची आरती करताना दिसत आहे. दोघेही आरतीची थाळी धरून पूर्ण भक्तीभावाने बाप्पाची पूजा करताना दिसत आहेत.
सोनाक्षी सिन्हाची पोस्ट व्हायरल
सोनाक्षीने हा व्हिडीओ शेअर करत ‘जेव्हा एक जोडपे खऱ्या अर्थाने एकमेकांच्या श्रद्धांना मान्यता देतात तेव्हा प्रेमाचे रूपांतर आदरामध्ये होते. लग्नानंतरचा आमचा पहिला गणपती’ असं कॅप्शन देखील दिलं आहे. पण या पोस्टमुळे सोनाक्षी(Sonakshi Sinha ) आता नेटकऱ्यांकडून ट्रोल होत आहे.
सोनाक्षीचा व्हिडिओ पाहून एका यूजरने मुस्लीम असूनही इतर धर्माच्या विधीत तू कसा काय सहभागी होऊ शकतो? असा प्रश्न झहीरला विचारला आहे. एका यूजरने ‘सोनाक्षीवर निशाणा साधत आता रमजानमध्ये रोजा धरणार का? असा प्रश्न विचारला आहे. दुसऱ्याने लिहिले की, अरे वा म्हणजे आता सोनाक्षी सिन्हा ही रोजा देखील ठेवणार, असं लिहिलं आहे.
सोनाक्षीने नवरा झहीरसोबत साजरा केला गणेशोत्सव
यामुळे सोनाक्षीची (Sonakshi Sinha ) ही पोस्ट आता तूफान व्हायरल होत आहे. सोनाक्षीच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर तिने निळ्या रंगाचा हेवी लाँग सूट परिधान केला आहे. तसेच केस मोकळे सोडले आहेत. तर अभिनेत्रीचा नवरा झहीरने सोनाक्षीला मॅचिंग डबल शेड ब्लू आणि व्हाईट कुर्ता पायजामा परिधान केला आहे. दोघेही यात फारच सुंदर दिसत आहेत.
View this post on Instagram
सोनाक्षी आणि झहीर यांच्या लग्नाला आता जवळपास 2 महीने झाले आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट केल्यानंतर या स्टार कपलने एकदम खासगी पद्धतीने लग्नाची नोंदणी केली. सोनाक्षी सिन्हा 23 जून 2024 रोजी तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत विवाह बंधनात अडकली. तिने मुंबईतील तिच्या अपार्टमेंटमध्ये लग्न केलं.
News Title : Sonakshi Sinha and Zaheer Iqbal are being trolled
महत्त्वाच्या बातम्या-
शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का; पुण्यातील बडा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
संतापजनक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाला ट्रेनच्या टॉयलेटमध्ये टाकून अज्ञात पालक पसार
कोथिंबीरच्या जुडीने खाल्ला भाव! एका जुडीची किंमत पाहून व्हाल थक्क
राज्यात आज मुसळधार! जाणून घ्या तुमच्या शहराला कोणता अलर्ट?
धक्कादायक! पुण्यात टेम्पो चालकाने मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीला चिरडलं, जागीच मृत्यू