Sonakshi Sinha | बॉलीवुड अभिनेत्री तथा बॉलिवुडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लाडकी लेक सोनाक्षी सिन्हा झहीर इक्बालसोबत लग्न बंधनात अडकली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट केल्यानंतर या स्टार कपलने एकदम खासगी पद्धतीने लग्नाची नोंदणी केली.
अगदी साधे-सिंपल लग्न केल्यानंतर सोनाक्षीने (Sonakshi Sinha) आपल्या जवळच्या मित्रांसाठी खास रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. सोनाक्षी सिन्हा हिने 23 जून 2024 रोजी झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. लग्नानंतर सोनाक्षी आणि झहीर दोघेही हनीमूनसाठी निसर्गरम्य ठिकाणी गेल्याचेही दिसून आलं.
झहीर इक्बालच्या कमेन्टनं वेधलं लक्ष
अशात झहीरच्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. लग्नाला काही दिवसही उलटत नाहीत तोच झहीर इक्बालने असं काही विधान केलंय ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. सोनाक्षी सिन्हाने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओवर झहीरने केलेली पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
सोनाक्षीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती मेकअप करताना दिसत आहे. लग्नानंतरच्या डेट नाइटसाठी ती तयारी करत होती. व्हिडिओमध्ये ती खूपच सुंदर दिसून येत आहे. सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) ही पोस्ट करताच पती झहीरने दोन मजेशीर कमेंट्स केल्या.
View this post on Instagram
“..म्हणून सोनाक्षीने केलं अगदी सिंपल लग्न”
त्याने पहिल्या कमेंटमध्ये लिहिलं की, ‘माझ्यासोबत धोका झाला आहे .’ तर दुसऱ्या कमेंटमध्ये त्याने म्हटलं की ‘यामध्ये आश्चर्यचकित होण्यासारखं नाही. तू नेहमीच माझ्याआधी तयार होते. ही तर चिटिंग आहे.’ या कमेंटसोबतच त्याने काही स्माईली आणि इमोजीही पोस्ट केल्या आहेत.
झहीरच्या या कमेंटवर चाहत्यांनी देखील मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये सोनाक्षीने सिंपल लग्न करण्यामागील कारण सांगितलं आहे. “आम्हाला आमचा हा स्पेशल दिवस स्मरणात राहील, असा करायचा होता. आम्हाला लग्न अगदी सिंपल आणि अनोखं करायचं होतं. त्यामुळे आम्ही घरीच लग्न करायचा निर्णय घेतला.”, असं सोनाक्षी (Sonakshi Sinha) म्हणाली होती.
News Title – Sonakshi Sinha and Zaheer Iqbal In discussion
महत्वाच्या बातम्या-
1500 रूपयांमध्ये लाडक्या बहिणीचं घर चालेल का?, संजय राऊतांचा हल्लाबोल
“छगन भुजबळ राजकारणातील फिरता रंगमंच, ते नाट्य देखील निर्माण करतात”
ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चेला जोर; अभिषेकच्या ‘त्या’ कृतीने सगळ्यांनाच धक्का
आज ‘या’ राशींच्या व्यक्तींना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता!
भाजप नेत्याचं मुस्लिमांबाबत वादग्रस्त वक्तव्य; राजकारण पेटलं