Sonakshi Sinha | अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) ही मध्यंतरी सिनेमांपासून लांब होती. मात्र तरीही ती चर्चेत होती. अशातच आता ती पुन्हा एकदा नव्या कारणाने चर्चेत आली आहे. सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि अभिनेता झहीर इक्बाल काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. मात्र आता या नात्याला आणि यांच्या विवाहाला सिन्हा कुटुंबाकडून विरोध होत असल्याची माहिती समोर आली आहे. लवने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामुळे आता त्यांने आपल्या बहिणीच्या विवाहाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
सोनाक्षीच्या भावाची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
लवने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. त्यात त्याने लिहिलं आहे की, “आज तुम्ही कोणत्या पक्षाच्या बाजूने आहात?”, असं कॅप्शन दिलं आहे. अशातच आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोनाक्षी (Sonakshi Sinha) भावाला सोशल मीडियावर फॉलो करत नाही. लव सिन्हाने केलेली पोस्ट ही पहिलीच पोस्ट नाही.
View this post on Instagram
दरम्यान सोनाक्षी सिन्हा ही झहीर इक्बालसोबत 23 जून 2024 रोजी विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. याबाबत या जोडप्याने अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. सेलिब्रिटींनी सोनाक्षी-झहीरचे लग्न होणार असल्याची पुष्टी केली आहे. याचपार्श्वभूमीवर सोनाक्षी सिन्हाच्या (Sonakshi Sinha) भावाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. तसेच त्याने माध्यमांसोबत बोलत असताना बहिणीच्या विवाहाबाबत वक्तव्य केलं.
सोनाक्षीच्या विवाहावर सोनाक्षीचा भाऊ म्हणाला…
काही दिवसांपूर्वी लव याला बहीण सोनाक्षी हिच्या लग्नाबाबत विचारण्यात आलं होतं. तेव्हा लव म्हणाला, मी सध्या मुंबईत नाही. माझं यासंबंधीत काहीही घेणं देणं नाही. यावर प्रतिक्रिया देण्याचा किंवा कोणताही अडकण्याचा माझा कोणताही हेतू नाही. मला सुरू असणाऱ्या चर्चांपासून दूरच राहायचं असल्याचं लव सिन्हा म्हणाला आहे.
अशातच आता झहीर आणि सोनाक्षी हे गेल्या 7 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. सोनाक्षी ही जहीरपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. ते दोघेही डबल एक्स एल या सिनेमात एकत्र दिसले होते. तसेच ती नुकतीच संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ या वेबसीरिजमध्ये दिसली होती. ‘हिरामंडी’मधील फरीदानच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीचे खूप कौतुक झालं आहे.
News Title – Sonakshi Sinha Brother Luv Sinha Social Media Post
महत्त्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये न आल्यास ‘या’ हेल्पलाईन नंबरवर करा तक्रार!
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा रान पेटवणार; लक्ष्मण हाके निर्णय घेणार?
सोनाक्षी-झहीरचे प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू! ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
छगन भुजबळ अजितदादांना धोका देऊन शरद पवार गटात जाणार का? भुजबळांनी दिल रोखठोक उत्तर
येत्या काही तासांत ‘या’ जिल्ह्यांत दमदार पावसाचा इशारा; कुठे बरसणार मुसळधार पाऊस?