Sonakshi Sinha | बॉलीवुड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाला आता जवळपास महिना होत आला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट केल्यानंतर या स्टार कपलने एकदम खासगी पद्धतीने लग्नाची नोंदणी केली. लग्न जरी सिंपल केलं असलं तरी सोनाक्षीने (Sonakshi Sinha) आपल्या जवळच्या मित्रांसाठी खास रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. त्यांच्या लग्नाचे आणि रिसेप्शन पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
अशात सोनाक्षी सिन्हाचा एक नवीन व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे सोनाक्षीच्या प्रेग्नेंन्सीच्या चर्चा रंगल्या आहेत. व्हिडीओमध्ये झहीर बायको सोनाक्षी हिची काळजी घेताना दिसत आहेत.या व्हिडिओवर चाहते देखील अनेक प्रतिक्रिया नोंदवत आहेत.
सोनाक्षी आणि झहीर यांचा व्हिडिओ व्हायरल
या व्हायरल व्हिडिओ वर एका नेटकऱ्याने कमेंट करत सोनाक्षी प्रेग्नेंट आहेस का?,असा प्रश्न केला. दुसरा नेटकरी म्हणाला, ‘लवकरच नवा पाहुणा येणार आहे.’ अन्य एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘बेबी बम्प दिसत आहेत वाटतं…’ यामुळे सोशल मीडियावर फक्त आणि फक्त सोनाक्षी-झहीर यांची चर्चा रंगली आहे.
सोनाक्षीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये देखील प्रेग्नेंन्सीबाबत भाष्य केलं होतं. “लग्नाआधीच माझं आयुष्य सेट असल्यामुळे मी आनंदी आहे. लग्नानंतर फक्त मी हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही. कारण, तिथे गेल्यानंतर लगेच प्रेग्नेंसीच्या चर्चा रंगतात. फक्त एवढाच फरक लग्नानंतर झाला आहे.”, असं सोनाक्षी (Sonakshi Sinha) म्हणाली होती.
View this post on Instagram
सोनाक्षी सिन्हा प्रेग्नेंट?
दरम्यान, व्हायरल व्हिडिओमध्ये झहीर याने जीन्स आणि टी-शर्ट घातल्याचे दिसत आहे. तर, सोनाक्षी ही पोल्का ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसून येत आहे. या ड्रेसमध्ये अभिनेत्री गरोदर असल्याचं दिसतंय, असा दावा काही नेटकरी करत आहेत. त्यामुळे सोनाक्षीच्या (Sonakshi Sinha) प्रेग्नेंन्सीच्या चर्चा रंगत आहेत.
सोनाक्षी सिन्हा हिने 23 जून 2024 रोजी झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. त्यांच्या लग्नाला आता महिना झाला आहे.लग्नाच्या एकच महिन्यात सोनाक्षी गरोदर असल्याच्या चर्चा आता होत आहेत. मात्र, याबाबत फक्त नेटकरी अंदाज बांधत आहेत. सोनाक्षी तसेच झहीर यांनी दोघांनीही याबाबत अधिकृत अशी कोणतीच माहिती दिली नाहीये.
News Title – Sonakshi Sinha pregnancy talk
महत्वाच्या बातम्या-
अमित शाहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया; म्हणाले..
“पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यात भांडण झालंय, त्यांनी..”; संजय राऊत यांची टीका
राज्यातील ‘या’ भागांमध्ये मुसळधार पाऊस, NDRF ची टीम तैनात
राज्यात पावसाचा धुमाकूळ! अनेक ठिकाणी शाळांना सुट्ट्या, ‘या’ भागांना आज हायअलर्ट
आज ‘या’ राशीच्या व्यक्तींच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील!