Sonakshi Sinha | बॉलीवुड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाला आता महिना होऊन गेला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट केल्यानंतर या स्टार कपलने एकदम खासगी पद्धतीने लग्नाची नोंदणी केली. लग्न जरी सिंपल केलं असलं तरी सोनाक्षीने (Sonakshi Sinha) आपल्या जवळच्या मित्रांसाठी खास रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते.
मात्र, सोनाक्षीच्या लग्नाला तिच्या घरच्यांचा विरोध होता, असं म्हटलं गेलं. शिवाय अभिनेत्रीचा भाऊ देखील लग्नात सामिल झाला नव्हता. अशात सोनाक्षीबद्दल एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.
सोनाक्षी सिन्हाची आई अजूनही नाराज?
सोनाक्षी हिच्या लग्नाला एक महिना झाला असला तरी, अभिनेत्रीची आई पूनम सिन्हा या नाराज असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. त्याला कारण देखील तसंच समोर आलं आहे. पूनम सिन्हा यांनी सोशल मीडियावर सोनाक्षी हिला फॉलो केलेलं नाही.
पूनम सिन्हा या इन्स्टाग्रामवर फक्त 6 जणांनाच फॉलो करतात. ज्यामध्ये सोनाक्षी नाही. शिवाय अभिनेत्रीचा भाऊ लव सिन्हा देखील सोनाक्षीला (Sonakshi Sinha) फॉलो करत नाही. सोनाक्षी देखील आई आणि भावाला सोशल मीडियावर फॉलो करत नाही. त्यामुळे सोनाक्षीच्या कुटुंबियात अजूनही नाराजी असल्याच्या चर्चा रंगत आहेत.
सोनाक्षीने आई पुनम सिन्हाला केलं अनफॉलो
दुसरीकडे, सोनाक्षी फक्त वडील शत्रुघ्न सिन्हा आणि भाऊ कुश सिन्हा यांनाच सोशल मिडियावर फॉलो करते. लग्न होण्यापूर्वी सोनाक्षी सिन्हा हिच्या आईने लेकीला अनफॉलो केल्याची माहिती देखील समोर आली होती. पाहायला गेलं तर, अजून याबाबत अधिकृत अशी कोणतीच प्रतिक्रिया सोनाक्षी किंवा तिच्या कुटुंबियांनी दिली नाहीये.
मात्र, यामुळे सोनाक्षी (Sonakshi Sinha) त्रस्त असल्याचं देखील म्हटलं जातंय. त्यामुळे सोनाक्षी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दरम्यान, सोनाक्षी सिन्हा हिने 23 जून 2024 रोजी झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. दोघेही आपलं वैवाहिक आयुष्य सुखी जगत आहेत. दोघे अनेक ठिकाणी सोबत स्पॉट होत असतात.
News Title : Sonakshi sinha still feel upset after marriage
महत्त्वाच्या बातम्या-
“नकार देऊन सुद्धा मला मित्रासोबत झोपायला…”, करिश्माच्या खुलाशाने बाॅलिवूड हादरलं
नवरा सिगरेट ओढत असेल तर आत्ताच व्हा सावध, धक्कादायक माहिती आली समोर
कोल्हापूरच्या स्वप्निल कुसळेनं जिंकलं भारतीयांचं मन; PM मोदी खास पोस्ट करत म्हणाले..
“मृत्यू नंतर माझं..”; मनोज जरांगे यांची वाढदिवशी मोठी घोषणा
महाराष्ट्राच्या सुपुत्राची ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी; भारताला तिसरं पदक