“तो माझं तोंड बंद…”, लग्नाच्या पाच महिन्यानंतर पती जहीरबद्दल सोनाक्षीचा गौप्यस्फोट!

sonakshi sinha

Sonakshi Sinha | अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा जहीर इक्बालसोबत काही महिन्यांपूर्वी लग्न बंधनात अडकली. गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट केल्यानंतर या कपलने एकदम खासगी पद्धतीने लग्न केलं. सोनाक्षी आणि जहीर सोशल मीडियावर कोणत्या न कोणत्या कारणावरुन ट्रोल होत असताना दिसतात. आपल्या चाहत्यांसाठी ती सतत दोघांचे कपल गोल्सचे फोटो व्हिडीओ शेअर करत असते. दरम्यान एका मुलाखतीमध्ये बोलत असताना सोनाक्षीने पती इक्बालबद्दल खुलासा केला आहे.

तुमच्या जावयाला ओळखलं नाही-

छोट्या पडद्यावरील द ग्रेट इंडियन शो या कपिल शर्माच्या कार्यक्रमात मोठ मोठे सेलिब्रेटी हजेरी लावत असतात. यावेळी या शोमध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, पती जहीर इक्बाल, वडील शत्रुघन सिन्हा आणि आई पूनम सिन्हा यांनी हजेरी लावली. दरम्यान, यामध्ये बोलत असताना सोनाक्षीने जहीर इक्बालबद्दल खुलासा केला.

व्हायरल व्हिडीओ-

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सोनाक्षी (Sonakshi Sinha) तिच्या वडिलांना सांगते की, ‘तुम्ही तुमच्या जावयाला अद्याप चांगल्या प्रकारे ओळखत नाही. तुमच्या मुलीचं कोणी तोंड बंद करु शकतो तर, तो फक्त झहीर आहे. यावर शत्रुघ्न सिन्हा म्हणतात, ‘असं असेल तर मुलगी योग्य ठिकाणी आहे. सोनाक्षीने केलेल्या वक्तव्यांवर झहीर देखील हसू लागतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

सोनाक्षीला (Sonakshi Sinha) जहीरसोबत लग्न केल्यानंतर प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. जहीर इक्बाल याच्यावर ‘लव्ह जिहाद’ सारखे आरोप देखील करण्यात आले होते. मात्र, या सर्व ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करत सोनाक्षीने लग्न केलं. आपल्या नवऱ्याचं सोनाक्षी कायम कौतुक करत असते. जहीर मोठ्या मनाचा व्यक्ती आहे. जहीर फक्त त्याच्या कुटुंबियांसाठी दयाळू नाही तर, आजू- बाजूच्या सर्व लोकांना तो सन्मान देतो. मला त्याचा स्वभाव फार आवडतो.”, असं एकदा एका मुलाखतीमध्ये सोनाक्षीने म्हटलं होतं.

News Title : sonakshi sinha talks about husband

महत्त्वाच्या बातम्या-

फडणवीसांना मुख्यमंत्री करणं भाजपला पडणार भारी?, ‘या’ 3 गोष्टींनी चिंता वाढवली

… त्या गोष्टीसाठी भाजप शिंदे व अजित पवारांचा पक्ष फोडेल!

दिल्लीतून ‘तो’ निरोप आला अन् इकडे एकनाथ शिंदे रूसल्याच्या चर्चेला उधाण

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दिला राजीनामा

सरकारकडून Pan Card संबंधी मोठा बदल; जुनं पॅनकार्ड रद्दीत जाणार, कारण..

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .