लग्नानंतरची पहिलीच होळी, मात्र सोनाक्षीला सोडून झहीर…; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Sonakshi Sinha Trolled for Celebrating Holi Alone 

Sonakshi Sinha | बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला (Sonakshi Sinha) तिच्या होळीच्या सेलिब्रेशनमुळे ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. लग्नानंतर पहिली होळी तिने एकटीने साजरी केली, त्यामुळे चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी तिच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. तिचा  पती झहीर इक्बाल (Zaheer Iqbal) सोबत फोटो न दिसल्याने अनेकांनी वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण दिले. मात्र, या ट्रोलिंगला सोनाक्षीने स्वतः उत्तर दिले आणि या चर्चांना पूर्णविराम दिला.

होळीच्या फोटोंवरून सोशल मीडियावर ट्रोलिंग

सोनाक्षीने सोशल मीडियावर तिचे होळी खेळतानाचे फोटो शेअर केले. यात ती पूर्णपणे रंगात भिजलेली आणि आनंदी दिसत होती. मात्र, या फोटोंमध्ये तिचा नवरा झहीर दिसत नसल्याने अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. ‘झहीर कुठे आहे?’ ‘तो रंग खेळत नाही का?’ किंवा ‘रमजानसाठी गेला आहे का?’ अशा प्रकारच्या कमेंट्स ट्रोलर्सकडून करण्यात आल्या. काहींनी लग्नानंतरची पहिली होळी दोघांनी एकत्र साजरी करायला हवी होती, असेही मत मांडले.

सोनाक्षीने 23 जून 2024 रोजी झहीर इक्बालसोबत विवाह केला. दोघे वेगवेगळ्या धर्मांचे असल्याने त्यांच्या नात्याविषयी सतत चर्चा सुरू असतात. त्यामुळे या वेळी झहीर अनुपस्थित असल्याने पुन्हा ट्रोलिंग सुरू झाले. मात्र, सोनाक्षीने यावर संतुलित आणि स्पष्ट उत्तर दिले.

ट्रोलर्सना सोनाक्षीचे सडेतोड उत्तर

नेटकऱ्यांच्या टिकेला उत्तर देताना सोनाक्षीने तिच्या इंस्टाग्रामवर लिहिले, “होळी आहे! सगळ्यांनी रंग खेळा, मजा करा. मी सध्या ‘जटाधारा’च्या शूटिंगसाठी बाहेर आहे, त्यामुळे झहीर माझ्यासोबत नाही. तो मुंबईत आहे. आता डोक्यावर थंड पाणी घाला आणि मजा करा!”

या उत्तरानंतर ट्रोलिंग काही प्रमाणात कमी झाले असले, तरी काहींनी तिच्या धर्म आणि नातेसंबंधांवर पुन्हा एकदा उगाच चर्चा सुरू केली. सोनाक्षीने मात्र कोणत्याही नकारात्मकतेला न जुमानता तिच्या होळीच्या सेलिब्रेशनचा आनंद घेतला.

Title : Sonakshi Sinha Trolled for Celebrating Holi Alone 

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .