Sonakshi-Zaheer Wedding l सोनाक्षी सिन्हा ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनाक्षी शेवटची संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ या वेबसीरिजमध्ये दिसली होती. ‘हिरामंडी’मधील फरीदानच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीचे खूप कौतुक झाले आहे.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल अडकणार विवाहबंधनात :
सोनाक्षीच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगायचे तर, अभिनेत्री 23 जून 2024 रोजी बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत लग्न करणार असल्याची अफवा पसरवली जात आहे. या जोडप्याने अद्याप त्यांच्या लग्नाबाबत अधिकृतपणे काहीही जाहीर केले नसले तरी अनेक सेलिब्रिटींनी सोनाक्षी-झहीरचे लग्न होणार असल्याची पुष्टी केली आहे.
सध्या लग्नाचे सोहळे सुरू झाले आहेत. सोमवारी, या जोडप्याने बॅचलर पार्टीचा आनंद लुटला, ज्याचे फोटो त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर देखील शेअर केले. आता सोनाक्षी-झहीरच्या प्री-वेडिंग फंक्शनची माहिती समोर आली आहे. तसेच चाहते देखील या जोडप्याच्या लग्नाची आतुरता लागली आहे.
Sonakshi-Zaheer Wedding l अवघ्या 50 लोकांच्या उपस्थितीत होणार लग्न :
23 जून रोजी सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या लग्नाबद्दल चाहते देखील खूप उत्सुक आहेत आणि त्यांना या जोडप्याच्या लग्नाशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्यायचे आहे. सोनाक्षी आणि झहीरचे ऑडिओ निमंत्रण, ठिकाण आणि पाहुण्यांची यादी लीक झाल्यानंतर आता त्यांच्या प्री-वेडिंग फंक्शनची माहिती देखील समोर आली आहे. या जोडप्याची 20 जून रोजी हळदी समारंभ असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, “हळदी फंक्शन सोनाक्षीच्या बांद्रा येथील नवीन घरात होणार आहे, जे तिने नुकतेच तिच्या पालकांचे घर सोडल्यानंतर खरेदी केले आहे. या सोहळ्यासाठी फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित राहतील आणि या सोहळ्यासाठी 50 पेक्षा कमी लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे हळदी फंक्शनसाठी तिने घराची निवड केली आहे.
News Title : Sonakshi-Zaheer Wedding
महत्त्वाच्या बातम्या
छगन भुजबळ अजितदादांना धोका देऊन शरद पवार गटात जाणार का? भुजबळांनी दिल रोखठोक उत्तर
येत्या काही तासांत ‘या’ जिल्ह्यांत दमदार पावसाचा इशारा; कुठे बरसणार मुसळधार पाऊस?
आज या राशीचे व्यक्ती मोठा निर्णय घेतील! पण कोणासाठी?
‘संघर्षयोद्धा’ सिनेमात छगन भुजबळ-गुणरत्न सदावर्तेंची भूमिका कुणी साकारली?
कार्यकर्त्याने धुतले नाना पटोलेंचे पाय, नेमकं काय घडलं?