“नाद फक्त तुमचाच”, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा ‘तो’ व्हिडिओ तूफान व्हायरल

Sonalee Kulkarni | ‘अप्सरा’ म्हणून प्रचलित असलेली मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहात असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनाली नेहमीच सक्रिय राहते. अशात तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये सोनाली एका जुन्या गाण्यावर थिरकताना दिसून आली.

सोनालीचा हा व्हिडिओ आता तूफान व्हायरल झाला आहे. तिच्या डान्सची चर्चा नेहमीच होत असते. नुकतीच अभिनेत्री आशा भोसलेंच्या एका जुन्या गाण्यावर थिरकली आहे. यावेळी तिच्या सोबतीला प्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटीलने देखील डान्स केला.

आशा भोसलेंच्या गाण्यावर थिरकली सोनाली

दोघांचा हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. त्यावर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत. गायिका आशा भोसले यांच्या “येऊ कशी प्रिया…” या गाण्यावर सोनाली कुलकर्णीने सुंदर असा डान्स केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने “स्टेजवर सादरीकरण करण्यापूर्वी खुद्द कोरिओग्राफरबरोबर व्हॅनिटी व्हॅनमध्ये डान्स केला” असं कॅप्शन दिलं आहे.

यावेळी सोनालीने (Sonalee Kulkarni) काळ्या रंगाचा अन् बाजूने त्याला गोल्डन बॉर्डर असलेला सुंदर असा नेट ड्रेस घातला होता. यामध्ये तिचं सौंदर्य अजूनच खुलून आलं. तिच्या अदा देखील यात घायाळ करणाऱ्या होत्या.

सोनालीच्या अदांनी चाहते घायाळ

सोनालीने (Sonalee Kulkarni) शेअर केलेल्या व्हिडीओवर अभिनेत्री क्रांती रेडकरने “तू खूपच सुंदर दिसत आहेस” अशी कमेंट केली आहे. तर, अन्य काही नेटकऱ्यांनी “झक्कास जबरदस्त एक नंबर”, “क्या बात है”, “खूपच सुंदर”, “नाद फक्त तुमचाच”, “वाह वाह” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

दरम्यान, सोनाली कुलकर्णीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर तिने ‘मलाइकोट्टई वालीबान’ या चित्रपटाच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वी पहिल्यांदाच मल्याळम सिनेसृष्टीत काम केलं आहे.

News Title : Sonalee Kulkarni Dancing video goes viral

महत्त्वाच्या बातम्या-

‘सामे’ गाण्यावर सोनालीने लगावले ठुमके; दिलखेचक अदांपुढे सारेच घायाळ, पाहा Video

“देवेंद्र फडणवीसांनी सोलापूरात दंगली घडवण्याचा प्रयत्न केला”; कॉँग्रेसच्या आरोपांनी राज्यभर खळबळ

“झुंडमे कुत्ते आते है.. शेर अकेला आता आहे”; शिंदे गटाच्या बॅनरबाजीनंतर राणेंच्या बॅनरने वेधलं लक्ष

ग्राहकांना फटका! सोनं महागलं, जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

शेतकऱ्यांनो खरीप हंगामासाठी आल्या ‘या’ योजना; अर्ज कसा करणार?