‘सामे’ गाण्यावर सोनालीने लगावले ठुमके; दिलखेचक अदांपुढे सारेच घायाळ, पाहा Video

Sonalee Kulkarni  | मराठी कलाविश्वाची ‘अप्सरा’ म्हणून प्रचलित असलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. सोनालीच्या एका पोस्टने धुमाकूळ घातला आहे. आपल्या दिलखेचक अदांनी सोनालीने चाहत्यांना घायाळ केलं आहे.

सोशल मीडियावर सध्या पुष्पा 2 या सिनेमातील ‘सामे’ हे गाणं प्रचंड ट्रेंड होतंय. या गाण्यावर अनेक जण रील्स बनवत आहेत. यावरच सोनाली हिनेही रील बनवली आहे. सोनालीची ही रील चाहत्यांच्या खूपच पसंतीस उतरली आहे.

‘सामे’ गाण्यावर थिरकली सोनाली

नेटकरी त्यावर विविध प्रतिक्रिया नोंदवत आहेत. सोनालीने या रीलमध्ये आकाशी रंगाचा गाऊन घातला आहे. तिने या गाण्यावर रील बनवत पुन्हा आपल्या दिलखेचक अदाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या रीलमध्ये सोनाली (Sonalee Kulkarni ) खूपच सुंदर दिसून येत आहे.

यावर एक नेटकरी प्रतिक्रिया करत म्हणाला की, ‘तुम्ही काही पण करा भारी वाटते’ तर, दुसरा एक नेटकरी म्हणाला की, ‘हे फ्यूजन खूप भारी आहे.. एकदम झक्कास’ अशा प्रतिक्रिया या व्हिडिओवर चाहते नोंदवत आहेत.

सोनाली कुलकर्णीचा व्हिडिओ व्हायरल

सोनालीने आजवर ‘नटरंग’, ‘मितवा’, ‘हिरकणी’, ‘क्लासमेट्स’, ‘तमाशा’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. सोनाली सोशल मीडियावर देखील नेहमीच सक्रिय असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shashank Sane (@saneshashank)

अशात सोनालीने (Sonalee Kulkarni  ) शेअर केलेल्या या नव्या व्हिडिओची चर्चा होते आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. दरम्यान, सोनाली कुलकर्णीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर तिने ‘मलाइकोट्टई वालीबान’ या चित्रपटाच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वी पहिल्यांदाच मल्याळम सिनेसृष्टीत काम केलं आहे.

News Title : Sonalee Kulkarni  video goes viral

महत्त्वाच्या बातम्या-

ग्राहकांना फटका! सोनं महागलं, जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

शेतकऱ्यांनो खरीप हंगामासाठी आल्या ‘या’ योजना; अर्ज कसा करणार?

नाशिककरांसाठी आनंदाची बातमी! नाशिक-बेंगळूर विमानसेवेला मिळाला हिरवा कंदील

सावधान! ‘या’ जिल्ह्यांत आज मुसळधार पाऊस बरसणार, हवामान विभागाचा इशारा

ओबीसी आरक्षणावरून राजकारण तापलं, प्रकाश शेंडगेंचा राज्य सरकारला गंभीर इशारा