मुंबई | अभिनेत्री सोनाली बेंद्रेनं फ्रेंडशिप डे च्या निमित्यानं एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या फोटोत कर्करोगामुळे सोनालीचे संपूर्ण केस गळाले असून टक्कल पडलेलं दिसतंय.
तिच्या खास मैत्रिणी सुझान खान आणि गायत्री जोशी ओबेरॉय यांच्यासोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत दोघींना फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा देत आहे. फ्रेंडशिप डेच्या निमित्तानं दोघी सोनालीला भेटायला गेल्याचं समजतंय.
दरम्यान, हा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन ‘बाल्ड इज ब्युटीफूल’ असे सांगत ती या आजारामुळे खचली नसल्याचे दाखवून दिले आहे.