पुणे मनोरंजन महाराष्ट्र

‘या’ भुमिकेसाठी सोनालीनं घटवलं तब्बल 5 किलो वजन

Loading...

पुणे| शिवाजी महाराजांनी गौरवलेली साहसी आई ‘हिरकणी’ची कथा प्रसाद ओक लवकरच मराठी प्रेक्षकांच्या भेटीला  घेऊन येत आहेत.  अभिनेत्री सोनाली कुलकर्णी  यात हिरकणीची भुमिका साकारणार आहे. यासाठी सोनालीनं  तब्बल 5 किलो वजन घटवलं.

या भुमिकेसाठी सोनालीला विशेष मेहनत घ्यावी लागली आहे. गेल्या वर्षभरापासून सोनाली हिरकणीचं राहणीमान अभ्यासून ते आत्मसात करत आहे. भाजी- भाकरी, ताक असा तिचा आहार गेल्या वर्षभरापासून  सुरू आहे. रोज गडावर चढ- उतार करणारी महिला शरीरानं कशी असेन अशा अनेक बारकाव्यांचा तिनं अभ्यास केला.

Loading...

हिरकणी गडावर दूध विकायची तसेच मीसुद्धा मुंबईतल्या आरे कॉलनीत जाऊन गाईचं दूध काढायला, गोवऱ्या थापायला, गोठा साफ करायला अशा अनेक गोष्टी शिकले, असंही सोनालीनं  एका मुलाखतीत सांगितलं.

सोनालीनं  ‘अजिंठा” नटरंग’ सारख्या चित्रपटातून तऱ्हेतऱ्हेच्या महत्त्वाच्या भुमिका साकारुन आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. हिरकणीमधल्या सोनालीच्या ग्लॅमरस आणि  नव्या लुकची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या:

Loading...

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या