मुंबई | मराठी-हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. याचं कारणंही तसंच आहे. सोनालीने आपल्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो पोस्ट केला होता. यावर तिने चाहतीला दिलेलं एक उत्तर चर्चेचा विषय ठरला आहे.
सोशल मीडियावर टाकलेल्या या फोटोवर ती पारंपरिक वेषभूषेत दिसत आहे. सोनालीने गुलाबी रंगाची साडी, नथ, दागीने घातले आहेत. मात्र, सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे ते तिनं गळ्यात घातलेलं मंगळसूत्र. हे मंगळसूत्र तिनं उलटं का घातलं यावरुन नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरु आहे.
तुझं मंगळसूत्र उलटं झालं आहे, अशी कमेंट एका चाहतीने केली होती. यावर सोनालीने दिलेल्या उत्तराने पेच वाढला आहे. लग्नानंतर काही दिवस उलटंच मंगळसूत्र घालतात, असं ती म्हणाली आहे. त्यामुळे सोनालीनं लग्न केलं आहे की काय अशा चर्चा सोशल मीडियावर होऊ लागल्या आहेत.
दरम्यान, सध्या सोनालीच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. कुणाल बेडोनेकर याच्याशी तिचं नाव जोडलं जात आहे.
View this post on Instagram
ट्रेंडिंग बातम्या-
सध्या माझे वाईट दिवस सुरु आहेत- इंदुरीकर महाराज
“पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे वागणार नाही ना… मला काही सांगायचं आहे”
महत्वाच्या बातम्या-
तृप्ती देसाईंवर अश्लील टीका करणाऱ्यांना किशोरी शहाणेंनी सुनावले खडेबोल
आगीची माहिती मिळताच अजितदादा घटनास्थळी; स्वत: दिल्या सूचना
वारकरी संप्रदाय संपवण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा डाव; इंदुरीकर प्रकरणावरून भाजपचा गंभीर आरोप
Comments are closed.