अप्सरा गर्ल सोनालीचा जलवा; पहा ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’मधील फोटो

मुंबई | महाराष्ट्राची अप्सरा म्हणून ओळखली जाणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीन मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमात दमदार परफॉर्मन्स केला. परफॉर्मन्ससोबतच तिच्या अनोख्या ड्रेसचीही सध्या जोरदार चर्चा आहे. 

मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमात तीने घातलेला ड्रेस अभिजीत ठाकूरने डिझाईन केला होता. याआधी सोनाली तिच्या अदाकारांनी प्रेक्षकांना आकर्षित करायचीच पण मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमात तिचं वेगळंच रुप बघायला मिळलं. 

तिने तिच्या या रुपाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या रुपाला पाहून अनेकजण घायाळ झाले असून हे फोटो मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहेत.