जो पाठीराखा त्याच्यावरच गेम केलास!; डीपी दादाला नॅामिनेट केल्याने अंकितावर भडकली

Bigg Boss Marathi 5 l यंदाच्या वर्षीच्या बिग बॉस मराठीच्या 5 व्या सिझनला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. अशातच या आठवड्यातील नॉमिनेशन टास्क कालच्या भागात पार पडला. यावेळी बिग बॉसने स्पर्धकांना मानकाप्याच्या खोलीत प्रत्येक सदस्याला दोन जोड्यांना नॉमिनेट करायला सांगितलं होतं. मात्र यावेळी अनेक स्पर्धकांचे खरे चेहरे समोर आले आहेत. या नॉमिनेशन टास्कदरम्यान अंकिताने वैभव आणि धनंजय पोवारच्या जोडीला थेट नॉमिनेट केलं आहे. यामुळे सर्वच प्रेक्षकांना धक्का बसला आहे.

सोनाली पाटील अंकितावर भडकली :

या सिझनमध्ये अंकिता आणि DP दादा यांच्यामधील घट्ट मैत्री वारंवार दिसून येत असते. मात्र अंकिताने DP दादाला थेट नॉमिनेट केल्याने प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अगदी काही दिवसांपूर्वी कोकणी गर्ल अंकिताने DP ला राखी बांधली होती. मात्र अंकिताने DP ला नॉमिनेट केल्याने बिग बॉस मराठी 3 ची चर्चेत असलेली स्पर्धक सोनाली पाटील चांगलीच भडकली आहे.

यावेळी सोनाली पाटीलने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती प्रचंड चिडून बोलते की, “काल बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क पार पडला. यावेळी अंकिता तुला जान्हवीबद्दल खूपच प्रेम आहे. आणि तुला सूरजबद्दल देखील प्रेम आहे. आम्हालाही सूरजबद्दल खूप प्रेम आहे. परंतु आम्हाला एक गोष्ट कळत नाही. तू DP दादा आणि वैभवला थेट नॉमिनेट केलं आहेस.

पुढे सोनाली पाटील म्हणाली की, DP दादा आणि वैभवच्या जोडीला तू थेट नॉमिनेट केलं आहेस. त्यामुळे तू DP दादा त्यांचं नाव वगळायला पाहिजे होतंस. DP दादा आणि तुझं हे बहीण-भावाच नातं आहेस. मात्र घराच्या आतमध्ये आणि बाहेर एक फेवरिझम असणं गरजेचं आहे. तसेच DP दादा हा कोणत्याही टास्कमध्ये जास्त दिसला नसेल पण प्रत्येकवेळी तो तुला सजेशन करताना तो समोर दिसत आहेस.

https://www.instagram.com/reel/C_KQsz8yaOy/?utm_source=ig_embed&ig_rid=c574e60c-dbdb-4220-9246-9d9f14c4aae6

Bigg Boss Marathi 5 l अंकिता DP दादा बरोबरच गेम खेळते : सोनाली पाटील

याशिवाय DP दादा हा तुझा भाऊ आहे, तसेच तो तुझा पाठीराखा आहे. आणि तू DP दादा बरोबरच गेम खेळतेस. परंतु हे मला हे अजिबात पटलेलं नाही. नॉमिनेशन टास्कमध्ये अजून जोड्या होत्या त्यांना तू नॉमिनेट केलं असतंस मात्र अंकिता तू कारण काय देत आहेस. तर DP दादाने पुढे जाऊन अजून खेळावं.

अंकिताने दिलेल्या कारणाचा अर्थ काय आहे? तर DP दादा आत्ता सुद्धा खेळत आहेसच. त्यामुळे DP दादा जरी थेट नॉमिनेशनमध्ये गेला तरी देखील आम्ही सगळे त्याच्या बरोबर आहोतच. त्यामुळे अंकिता जे काही वागलं आहे हे मला अजिबात आवडलेलं नाही असं सोनाली पाटील म्हणाली आहे.

News Title : Sonali patil aginst on ankita prabhu walwalkar

महत्त्वाच्या बातम्या-

पोकळ नेते उघडे पडतातच!; शिवरायांचा पुतळा कोसळ्याने किरण माने संतापले

श्रीकृष्णाची पूजा करताना अंकिता लोखंडेकडून चूक, नेटकरी भडकले!

मंकीपॉक्स टेस्ट करणं झालं सोपं; अवघ्या ‘इतक्या’ वेळात होणार टेस्ट

अत्यंत भयंकर! तरूणीसोबत घडलेल्या घटनेनं पुणे हादरलं

रोज सकाळी फक्त 1 किलोमीटर चालल्याने किती कॅलरिज बर्न होतात?