बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोनाली फोगट मृत्यू प्रकरणाला नवं वळण, अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

नवी दिल्ली | भाजपच्या नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट (Sonali Phogat) यांची 23 ऑगस्ट रोजी हत्या करण्यात आली. सोनाली फोगट यांच्या पाण्यात विष मिसळून त्यांचा जीव घेतल्याची कबुली गुन्हेगारांनी दिली होती.

सोनाली यांच्या भावाने तक्रार केल्यानंतर सुधीर सांगवान आणि सुखविंदर यांच्यावर एनडीपीएस (NDPS) कायद्यान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोनाली यांची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी आणि सगळी संपत्ती, आर्थिक मालमत्ता (Financial assets) हडप करण्यासाठी हे कृत्य केलं असल्याचं आरोपींनी सांगितलं.

याबाबतची चौकशी सुरू असतानाच या प्रकरणी फोगट यांची कन्या यशोधारा हिनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Prime Minister Narendra Modi) पत्र लिहिलं होत. या पत्रात या सर्व प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत (CBI) करण्याची मागणी केली होती. त्यामुळे यापुढे या हत्याप्रकरणाचा तपास (A murder investigation) सीबीआयतर्फे करण्यात येणार आहे.

फोगट यांच्या पाठीमागे सर्व मालमत्तेची वारसदार (Heir to property) त्यांची कन्या यशोधारा फोगट असणार आहे. त्यामुळं तीच्या जीवाला धोका असून तीला पोलिस संरक्षण (Police protection) देण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

थो़डक्यात बातम्या

मोठी बातमी! नवनीत राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल

नरेंद्र मोदींना मिळालेल्या लाखो रूपयांच्या भेटवस्तूचा लिलाव होणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More