बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

It’s a boy! सोनम कपूरच्या घरी चिमुकल्याचं आगमन, पोस्ट करत म्हणाली…

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या (Sonam Kapoor) घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. सोनम व तिचा पती आनंद अहुजाने (Anand Ahuja) इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ही गोड बातमी सगळ्यांना सांगितली आहे.

आमचे आयुष्य बदलले असून आता एका नव्या आयुष्याची सुरूवात झाल्याचं सोनम व आनंदने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तर त्या दोघांनी देवासोबत सर्व डॉक्टर्स आणि परिचारिकांचे देखील आभार मानले आहेत.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून सोनमच्या प्रेग्नंसीच्य चर्चा रंगल्या होत्या. तिच्या मॅटर्निटी फोटोशूटची देखील खूप चर्चा होती. सोनमने नुकतंच तिचा चुलत भाऊ अर्जुन कपूरसोबत (Arjun Kapoor) ‘कॉफी विथ करण’ शो मध्ये हजेरी लावली होती.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More