बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘लंडनमध्ये मी स्वातंत्र्याचा अनुभव घेते आहे’; सोनम कपूर सोशल मीडियावर झाली ट्रोल

मुंबई | प्रसिद्ध बाॅलिवूड अभिनेत्री सोनम कपूर पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे. सोनम तिच्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असते. अशातच पुन्हा एकदा एका वक्तव्यामुळे ती ट्रोल झाली आहे.

सोनमने एका मुलाखतीमध्ये आपण लंडनमध्ये स्वातंत्र्य उपभोगत असल्याचं म्हटलं होतं. याच वक्तव्यामुळे नेटकरी तिच्यावर भडकले आहेत. देशात घरकामं करणं लज्जास्पद आणि विदेशात केलं तर स्वातंत्र्य?, असा सवाल करत सध्या तिला ट्रोल केलं जात आहे. अलीकडेच एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत लंडनमध्ये मी स्वातंत्र्याचा अनुभव घेते आहे, असं ती म्हणाली.

मला इथलं स्वातंत्र्य आवडतं, मी स्वत: स्वयंपाक करते, घराची साफसफाई करते, बाजारातून किराणा खरेदी करते, असा अनुभव तिने सांगितला आहे. या विधानामुळे सध्या तिला जोरदार ट्रोल केलं जात आहे. ‘लंडनमधील स्वातंत्र्य’ या वाक्‍यावरून नेटकऱ्यांनी सोनमवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, भारतातदेखील सोनम स्वत: काम करू शकली असती घरकामांसाठी माणसं ठेवण्याची तिच्यावर कुणी जबरदस्ती केली नाही, असं म्हणत नेटकऱ्यांनी सोनमचा समाचार घेतला.

थोडक्यात बातम्या-

“दुबळयास घाबरतं ते सरकार वृत्तीने हुकूमशाही, पण मनाने दुर्बलच असतं”

आमच्याकडेही अनेक भास्कर जाधव आहेत- बाळासाहेब थोरात

“देश उलथवून टाकण्याच्या कटात हा म्हातारा म्हणे सामील होता”

मंगलकार्यालयात बॉयफ्रेंडचं लग्न सुरु, बाबू- बाबू म्हणत गर्लफ्रेंडचा गेटवर आक्रोश

‘रोज एक कॉफी प्यायल्यास…’; संशोधनातून महत्त्वाची माहिती आली समोर

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More