बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोरोनाची लस भारतात कधी उपलब्ध होईल, मला कोणी सांगू शकेल का?”

मुबंई | राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठया प्रमाणात वाढले आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीस केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घोषणा केली होती की भारतात कोरोनाच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरू होईल, ही बातमी सोशल मीडियावर तसेच बातम्यांमधून पसरली होती, तरी ही बॉलिवूडची अभिनेत्री सोनम कपूरने विचारलं की भारतात कोरोनाची लस आली का?, त्यामुळे सोनम चांगलीच ट्रोल होताना दिसत आहे.

माझ्या आई-वडिलांना आणि आजी आजोबांना भारतात लस कशी दिली जाऊ शकते?, ती केव्हा उपलब्ध होईल?, याबद्दल मला कोणी सांगू शकेल का?, कारण मी खूप गोंधळलेली आहे? असे सवाल सोनमने चाहत्यांना केले आहेत. प्रत्येकाकडून वेगवेगळ्या गोष्टी ऐकत आहेत. जर त्यांना ती लस भेटली तर खुप बरं होईल, असंही सोनम कपूरने म्हटलं आहे. मात्र सोनमने विचारलेल्या प्रश्नांमुळे सोशल मीडियावर ती ट्रोल होत आहे.

काहींनी तिला सरकारी साइट्सवर जाण्याचा किंवा जावडेकरांच्या घोषणेविषयी बातम्या वाचण्याचा सल्ला दिला. आपल्याकडे फोनमध्ये गूगल नाही?, तू वृत्तवाहिन्या पाहत नाही का?, प्रत्येक वर्तमानपत्रात, टीव्हीवर, वेबसाईट्सवर कोरोनाबाबत माहिती दिली जात आहे . कधी तरी स्वत:चं डोकं चालव, अशा प्रकारे ट्विट करत ट्रोलर्सनं सोनम कपूरची खिल्ली उडवली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या लसीकरणाबाबत सरकारकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल माहिती देताना सांगितलं की 1 मार्चपासून 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोना लस दिली जाईल. प्रकाश जावडेकर पुढे म्हणाले की, देशातील ज्या 10,000 शासकीय केंद्रांवर लोक लसीकरण करतील त्यांना विनाशुल्क लसीकरण केलं जाईल. ज्यांना कोरोना लस खासगी रुग्णालयात दिली जाते, त्यांना त्यासाठी पैसे द्यावे लागतील. लसीची किंमतदेखील लवकरच आरोग्य मंत्रालयाद्वारे जाहीर केली जाईल.

थोडक्यात बातम्या-

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेली कार, पाहा व्हिडीओ!

संजय राठोड यांना मोठा धक्का; खासदार गिरीश बापट यांच्या सूनेकडून पोलिसात तक्रार दाखल

मंत्री 10 हजार लोकं जमवतो आणि अधिवेशनाला मात्र कोरोना, कोरोना- देवेंद्र फडणवीस

“आम्ही वाघ आहोत अशा डरकाळ्या फोडण्यापेक्षा चित्राताईंसारखी “वाघा”ला साजेशी भूमिका घ्या!”

“दोन मिनिटाच्या भेटीत बहुदा कानात सांगितलं असावं, मी तुला उद्ध्वस्त होऊ देणार नाही

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More