नवी दिल्ली | दिल्लीतील जामीया विद्यापीठात गोळीबार झाल्याची घटना ताजी असताना शाहीनबाग परिसरातही गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेच्या संदर्भात देशभरातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यावर बाॅलिवूड अभिनेत्री सोनम कपूरनेही आपलं मत मांडलं आहे.
मी कधी कल्पनाही केली नव्हती की भारतात असं काही होईल. कृपया हे देशाचं विभाजन करत असलेलं राजकारण थांबवा. हे देशात द्वेष पसरवणारं असल्याचं सोनम कपूरनं म्हटलं आहे.
जर तुम्ही स्वतःला हिंदू समजत असाल तर हे लक्षात घ्या की हा धर्म आपल्याला धर्मासोबतच कर्माबद्दलही शिकवण देतो. हे जे चाललं आहे ते या दोन्ही पैकी एकही नाही, असंही सोनमनं म्हटलं आहे.
दरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायदा आणि संभाव्य राष्ट्रीय नागरिक नोंदणी या मुद्यांवरुन शाहीनबागमध्ये गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरु आहे.
This is something that I never imagined would happen in India. Stop this divisive dangerous politics. It fuels HATE. If you believe yourself to be a Hindu then understand that the religion is about Karma and dharma and this is not either of those. https://t.co/nAZcUX6p7o
— Sonam K Ahuja (@sonamakapoor) February 1, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
“मुंबईकरांना 24 तास पाणी देऊ म्हणणाऱ्यांनी 24 तास बार उघडे केले, हे तर ठग्ज आँफ मुंबईकर!”
कागदोपत्री आकड्यांचा मेळ घालून सादर केलेला अर्थसंकल्प- धीरज देशमुख
महत्वाच्या बातम्य-
“प्रत्येक सरकार मराठा समाजातील मुलामुलींसाठी जागा भरण्याच्या घोषणा करतायेत”
लोणीकर, तुमच्यासारख्या व्हिलनचा सुपडा साफ करायला वेळ लागणार नाही- रुपाली चाकणकर
“कॅबिनेटमध्ये शिवसेनेचे मंत्री कारकून सारखे बसलेले असतात”
Comments are closed.