Top News देश राजकारण

“सोनिया गांधी आणि मायावतींना ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करा”

नवी दिल्ली |  संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो मायावती यांना भारतरत्न देऊन सन्मानित करायला हवं, असं मत उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते हरिश रावत यांनी व्यक्त केलं आहे.

यासंदर्भात हरिश रावत यांना आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन ट्विट केलं आहे. हरिश रावत यांनी ही पोस्ट भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केली आहे.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती या दोघीही हुशार आणि प्रखर महिला राजकारणी असून त्यांच्या राजकारणाशी तुम्ही सहमत असाल किंवा नसाल, पण भारतीय महिलांचा सन्मान आणि सामाजिक समर्पण तसेच लोकसेवेच्या मापदंडांना सोनिया गांधी यांनी एक नवी उंची प्राप्त करुन दिल्याचं कोणीही नाकारु शकत नाही. त्यांना आज भारतीय महिलांचे गौरवशाली स्वरुप मानलं जातं.

त्याचबरोबर अनेक वर्षांपासून पीडित-शोषित लोकांच्या मनात मायावती यांनी एक अद्भुत विश्वास जागृत केला असल्यामुळं भारत सरकारनं या दोन्ही व्यक्तिमत्वांचा भारतरत्न देऊन सन्मान करावा, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘त्याच्यामुळे माझं जीवन उद्ध्वस्त झालं’; नीरव मोदीची बहिण माफीचा साक्षीदार होण्यास तयार

आमदार दिलीप बनकरांच्या पुत्राच्या शाही विवाह सोहळ्याच्या चौकशीचे आदेश!

पोर्तुगालमध्ये Pfizer ची लस घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू!

“अंबानी, अदानी हे दोन उद्योगसमूह शेतीच्या ठेकेदारीत घुसतील आणि भविष्यात शेतकरी भिकेला लागेल”

“पोलिसांनी वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग दाखवू”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या