बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेस अध्यक्षाची निवड आणि सोनिया-राहुल बैठकीतून बाहेर…!

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्षांची निवड सुरू असताना आपण तिथं उपस्थित असणं योग्य नसल्याचं कारण देत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी बैठकी बाहेर जाण्याचा निर्णय घेतला.

राहुल गांधींनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून काँग्रेस अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर पक्षाच्या कार्यकारणीची बैठक सुरू आहे.

काँग्रेसच्या कार्यसमितीनं 5 गट तयार केले असून ते देशभरातल्या नेत्यांशी चर्चा करत आहे. आज रात्री 8 वाजता हे गट अहवाल सादर करणार आहेत. गोंधळाचं वातावरण आज संपावं अशी सर्वांचीच इच्छा असल्याचं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातले काँग्रसचे जेष्ठ नेते मुकुल वासनिक यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड होऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

ऑल इंडिया काँग्रेस कमिटीकडून करण्यात आलेलं ट्वीट-

महत्वाच्या बातम्या-

-प्रकाश आंबेडकर यांची शिवसेनेवर जोरदार टीका

“ही परिस्थिती राजकारण करण्याची नाही, त्यासाठी पुष्कळ जागा आहेत”

-“चंद्रकांत पाटलांना 250 जागांचा अंदाज येतो, पावसाचा येत नाही का???”

-ब्रह्मनाळ दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांची माहिती

-सरकारने निर्लज्जपणाचा कळस केलाय- अशोक चव्हाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More